ETV Bharat / state

मतदानाची शाई दाखवा आणि २०% डिस्काऊंट मिळवा; कीबा हॉटेलची ऑफर

कीबा हॉटेलचे मॅनेजर गोकुळ शर्मा यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

author img

By

Published : Apr 29, 2019, 1:42 PM IST

कीबा हॉटेल

पनवेल - भारतीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका. या उत्सवात जास्तीत-जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरु असतात. वैयक्तिक पातळीवरही अनेकांकडून प्रयत्न केले जातात. प्रशासनाच्या प्रयत्नांना पनवेलमधील काही व्यासायिकांनीही स्वतःहून पुढे होत साथ दिली आहे. मतदान केल्याची शाई दाखवा आणि बिलात २० टक्के सूट मिळवा, अशी ऑफर खान्देश्वरमधल्या कीबा हॉटेलने दिली आहे.

मतदानाची शाई दाखवा आणि २०% डिस्काऊंट मिळवा

आज राज्यभरात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या प्रक्रियेपासून अनेक वेळा मतदार लांब राहतात. अशा नागरिकांना जागृत करून त्यांनी मतदानाचा आपला अधिकार बजावावा यासाठी प्रयत्न होत असताना पनवेलमधील खांदेश्वर इथल्या फाईन डाईन कीबा हॉटेलने प्रशासनाबरोबर मतदाराला अनोखी साद घातली आहे. मतदान केल्यानंतर पुढील आठ दिवस या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

कीबा हॉटेलचे मॅनेजर गोकुळ शर्मा यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आम्ही मतदान तर करूच, पण तुमच्याकडे येऊन तुमच्या प्रयत्नांनाही दाद देऊ अशा कमेंट सोशल मीडियावर येत आहेत.

मतदानानंतर पुढील आठ दिवस खान्देश्वर इथल्या कीबा हॉटेलमध्ये मतदारराजाला हा डिस्काऊंट मिळणार आहे. व्हेज आणि नॉन व्हेज जेवणावर ही सूट मिळवता येणार आहे. राजकीय नेत्यांच्या घोषणांच्या धामधुमीत कीबा हॉटेलची ही लोकशाही सबळ करण्याची घोषणाही चांगलीच चर्चेत आली आहे.

Intro:बातमीला व्हिडीओ आणि बाईट सोबत जोडले आहेत.

पनवेल

भारतीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका.. या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरु असतात. शिवाय वैयक्तिक पातळीवरही अनेकांकडून प्रयत्न केले जातात. प्रशासनाच्या प्रयत्नांना पनवेलमधील काही व्यासायिकांनीही स्वतःहून पुढे होत साथ दिली आहे. मतदान केल्याची शाई दाखवा आणि बिलात 20 टक्के सूट मिळवा, अशी ऑफर खान्देश्वरमधल्या कीबा हॉटेलने दिली आहे.
Body:आज राज्यभरात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतंय. या प्रक्रियेपासून अनेक वेळा मतदार लांब राहतात. अगदी अनेक सुशिक्षित नागरिकही मला काय करायचंय अशा भावनेतून मतदान करत नाहीत. अशा नागरिकांना जागृत करून त्यांनी मतदानचा आपला अधिकार बजावावा यासाठी प्रयत्न होत असताना पनवेलमधील खांदेश्वर इथल्या फाईन डाईन कीबा हॉटेलने प्रशासनाबरोबर मतदाराला अनोखी साद घातली आहे. आज तुम्ही मतदान केलं केलं की त्या दिवसापासूनच पुढील आठ दिवस या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

मतदान हा जसा प्रत्येकाचा अधिकार आहे तसा ते प्रत्येकाचं कर्तव्यही आहे. तुमचं एक एक मत या देशाचा भविष्य घडवण्यासाठी महत्वाचे आहे. याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी हा प्रयत्न आहे. सोशल मीडियावर कीबा हॉटेलचे मॅनेजर गोकुळ शर्मा यांनी याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियातून त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तर अनेकांनी आम्ही मतदान तर करूच, पण तुमच्याकडे येऊन तुमच्या प्रयत्नांनाही दाद देऊ अशा कमेंट सोशल मीडियावर येत आहेत. त्यामुळे मतदान केल्यानंतर चमचमीत पदार्थांवर तुम्ही ताव मारू शकता. अट फक्त ऐवढीच की मतदान करा.आणि या ताव मारलेल्या जेवणावर तुम्हाला 20 टक्के सूट मिळेल.Conclusion:मतदानानंतर पुढील आठ दिवस खान्देश्वर इथल्या कीबा हॉटेलमध्ये मतदारराजाला हा डिस्काऊंट मिळणार आहे. व्हेज आणि नॉन व्हेज जेवणावर ही सूट मिळवता येणार असल्याने निवडणुकीच्या राजकीय नेत्यांच्या घोषणांच्या धामधुमीत कीबा हॉटेलची ही लोकशाही सबळ करण्याची घोषणाही चांगलीच चर्चेत आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.