रायगड- मुंबई पुणे महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून आयआरबी आणि वाहतूक पोलीस महामार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोन्ही अपघात मुंबई लेनवर झाले आहेत.
मुंबई पुणे महामार्गावर साखर घेऊन मुंबईकडे निघालेला ट्रक अमृतांजन पुलाजवळ पलटी झाला. या अपघातात साखरेचे पोती अंगावर पडून एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. तर दुसरा अपघात हा फुडमॉल जवळ मुंबई लेनवर झाला. कंटेनर पलटी होऊन या अपघातात एक जण ठार तर दुसरा जखमी झाला आहे.
दोन्ही अपघात हे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. आयआरबी, वाहतूक पोलीस, अपघातग्रस्त टीम घटनास्थळी पोहचले असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.