पुणे - येस बँकेसंदर्भात घडलेली घटना ही तात्पुरती आहे. आगामी आठवडाभरात या बँकेचे सर्व व्यवहार सुरळीत होतील. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जिल्हा बँकांना दिलेली रक्कम येस बँकेत अडकल्याचे सांगितले जात आहे. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना आधीच वितरीत करण्यात आली आहे. त्यामुळे जो काही त्रास होणार आहे तो जिल्हा बँकांना होणार असल्याचे मत दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले आहेत.
हेही वाचा - महिला दिन विशेष: गॅरेज व्यवसायात तिनं निर्माण केलं स्वत:चं अस्तित्व....
जिल्हा बँकांचा ताळेबंद व्यवस्थित ठेवण्यासाठी 31 मार्चपूर्वी या बँकांना हे पैसे देणे गरजेचे आहे. परंतु आठवडाभरातच ही बँक पूर्ववत होईल. त्यामुळे ठेवीदार आणि खातेदारांनी घाबरुन जाण्याची गरज नाही असेही अनास्कर यावेळी म्हणाले.
हेही वाचा - महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला; पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण