ETV Bharat / state

दाराची कडी लागून घरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुखरूप सुटका - पुणे अग्निशमनदल बातमी

घराच्या दाराची कडी लागून आत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली आहे.

woman-trapped-in-house-getaway-by-fire-brigade-in-pune
दाराची कडी लागून घरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुखरूप सुटका
author img

By

Published : Jan 1, 2021, 7:16 PM IST

पुणे - आज शुक्रवार सकाळी साडेदहा वाजता सहकारनगर येथे एक जेष्ठ महिला घराच्या दाराची कडी लागून आत अडकली असून कोणताही प्रतिसाद देत नसल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली होती. या घटनेची तत्काळ दखल घेत अग्निशमन दलाले घरात अडकेलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका केली आहे.

ज्येष्ठ महिलेची सुखरूप सुटका

लोखंडी जाळी कापत केला प्रवेश -

अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती प्राप्त होताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. घटनास्थळी पोहोताच अग्निशमन दलाच्या जवानांनी पहिल्या मजल्यावर शिडी लावून पाहणी केली असता, ती महिला पडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर खिडकीजवळ असलेली लोखंडी जाळी कटरच्या सहाय्याने कापत घरात प्रवेश केला व कडी उघडून महिलेची सुखरूप सुटका केली.

हेही वाचा - कोरोना विजयी : न घाबरता केली कोरोनावर मात, दुसऱ्यांसाठी मार्गदर्शक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.