ETV Bharat / state

भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; महिला जागीच ठार, १ जखमी

author img

By

Published : Jan 2, 2021, 8:00 AM IST

भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक पुरूष जखमी झाला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ येथे ही घटना घडली.

woman dies after bike hit by truck on pune-solapur highway
भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; महिला जागीच ठार, १ जखमी

दौंड (पुणे) - भरधाव पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक पुरूष जखमी झाला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ येथे ही घटना घडली. दरम्यान, जखमीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ येथील हॉटेल फौजीच्या समोर असणाऱ्या रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी हा अपघात झाला. पिकअप (एमएच ४५ टी २२२८ ) ने भरधाव वेगाने दुचाकी (एमएच २५ एइ ४४२४) ला धडक दिली. महामार्गावर रस्ता दुभाजक असताना देखील या परिसरात हायमास विजेची व्यवस्था करण्यात आलेली नसून या परिसरात यापूर्वी देखील अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत.

पिकअप चालक फरार -
दरम्यान प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवरून प्रवास करणारे परांडा येथील रहिवाशी असून त्यांची नावे अमोल सोनवणे आणि पुष्पा सोनवणे अशी आहेत. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाला.

हेही वाचा - पिंपरीत 80 तळीरामांवर कारवाई; चलनातून एका दिवसात 12 लाखाहून दंड

हेही वाचा - दाराची कडी लागून घरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुखरूप सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.