ETV Bharat / state

बीएसएनएलमधून 78 हजार 500 कर्मचाऱ्यांची स्वेच्छा निवृत्ती

बीएसएनएलमधून संपूर्ण भारतातून 78 हजार 500 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून निधी दिला जाणार असल्याने त्याचा भार बीएसएनएलवर पडणार नाही.

BSNL
बीएसएनएल
author img

By

Published : Feb 17, 2020, 5:50 PM IST

पुणे - बीएसएनएलमधून संपूर्ण भारतातून 78 हजार 500 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. संपूर्ण भारतात बीएसएनएलचे 1 लाख 49 हजार कर्मचारी होते. त्यामुळे आता 78 हजार 500 कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतली आहे. 31 जानेवारी 2020 ला या लोकांनी बीएसएनला निरोप दिला असल्याचे बीएसएनएल बोर्डाचे मानव संसाधन विभागाचे महासंचालक अरविंद वडनेरकर यांनी सांगितले.

भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल बंद पडणार नाही. बीएसएनएल बंद पडणार असल्याचे वृत्त ही अफवा असून केंद्र सरकार बीएसएनएलच्या पाठीशी उभे आहे, असा विश्वासही वडनेरकर यांनी व्यक्त केला.

अरविंद वडनेरकर, महासंचालक मानवसंसाधन बीएसएनएल बोर्ड

हेही वाचा - पुणेकरांसाठी खुशखबर.. 'या' टोलनाक्यावर पुण्यातील वाहनांना टोल माफ

या योजनेमुळे बीएसएनएलचा वेतनावरील भार हा तब्बल 7 हजार 200 कोटींने कमी होणार आहे. स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून निधी दिला जाणार असल्याने त्याचा भार बीएसएनएलवर पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले एकंदरीतच केंद्र सरकारने बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी सुचवलेल्या 5 कार्यक्रमांपैकी स्वेच्छा निवृत्ती हा महत्वाचा भाग पूर्ण झाला आहे. तसेच बीएसएनएलच्या जागा विकण्याचा टप्पा ही पूर्ण केला जाणार आहे. लवकरच बीएसएनल पुन्हा प्रगतीपथावर येईल, असा विश्वासही वडनेरकर यांनी व्यक्त केला.

एप्रिल 2020 पर्यंत बीएसएनला 4g स्पेक्ट्रम मिळेल आणि ऑक्टोंबर 2020 पर्यंत भारतामध्ये बीएसएनल 4g सुरू होईल. बीएसएनल विकली जाणार हे वृत्त खोटे आहे. केंद्र सरकार बीएसएनलच्या पाठीशी असून व्हीआरएसनंतर आता बीएसएनलचे पुनरुज्जीवन व्हायला सुरुवात झालीय, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - पुण्यात खंडणीप्रकरणी पोलीस मित्र अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.