पुणे- तरवडेवस्ती साठेनगर भागात गुंडांच्या टोळक्याकडून पुन्हा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यामध्ये टोळक्याकडून आठ ते नऊ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आठ दिवसात दुसऱ्यांदा तोडफोडीची घटना
शुक्रवारी मध्यरात्री दुचाकीवर आलेल्या गुंडांच्या टोळक्यांनी साठेनगर भागातील नागरिकांना धमकावत रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांची तोडफोड केली. गेल्या आठ दिवसात तोडफोडीची ही दुसरी घटना आहे. या तोडफोडीत रिक्षा, दुचाकीसह आठ ते दहा गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तोडफोडीच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातवरण पसरले आहे. त्यामुळे पुण्यात कायदा आणि सुवव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
![पुण्यात पुन्हा गुंडांच्या टोळक्याचा तुफान राडा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-vehicle-todfod-crime-av-7201348_13022021095949_1302f_1613190589_746.jpg)