पुणे - भीमाशंकर अभयारण्यात एका ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. राजगुरूनगर पोलिसांनी घटनास्थळी आत्महत्या केलेल्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली रुग्णालयात पाठविला आहे.
हेही वाचा - कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; चांगले दर मिळत असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
भीमाशंकर अभयारण्यात आत्महत्या केलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून त्याने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला असून त्यावर साई सिस्टिम आणि शर्टाच्या बाहीवर सफर 'स्व्केअर अँटोमेशन' असे लिहिले आहे. भीमाशंकर अभयारण्य हा परिसर घनदाट जंगलाने भरलेला आहे. त्यामुळे या परिसरात शांतता पसरलेली असते. या परिसरात अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी हत्या तर कधी आत्महत्या सारख्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.