ETV Bharat / state

नोकरी लावण्याच्या बहाण्याने बारामतीत युवकाला चार लाखांचा गंडा

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील युवकाला नोकरी लावण्याच्या बहाण्याने चार लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी युवकाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लचंदनगर पोलीस स्टेशन
लचंदनगर पोलीस स्टेशन
author img

By

Published : Dec 6, 2020, 7:55 PM IST

बारामती - इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील युवकाला नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवण्यात आले आहे. युवकाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रकरणी ३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रकाश बबन कोळेकर (रा.भवानीनगर.ता.इंदापूर) यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सिद्धार्थ देविदास झेंडे, प्रगती सिद्धार्थ झेंडे (दोघे रा. म्हसोबाचीवाडी ता.इंदापूर), बबन सिताराम दळवी, पुष्पा बबन दळवी ( दोघे रा. डोर्लेवाडी ता.बारामती) व किरण लव्हाजी मदने ( रा.ढेकळवाडी ता.बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

१० लाख रुपयांची केली मागणी-

प्रकाश कोळेकर यांचा मुलगा आशिष याचे तेरावी पर्यंत शिक्षण झाले आहे. आरोपींनी त्याला पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १० लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र साडेसात लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार ३ फेब्रुवारी २०२० रोजी यातील ५ लाख रुपये रोख स्वरूपामध्ये आरोपींनी घेतले. त्यांतर मंत्रालयातील लिपिक पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन त्याला ४ मार्च २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितले.

पैशाची वेळोवेळी केली मागणी-

बनावट नियुक्तीपत्र असल्याने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजर करून घेतले नाही. ७ दिवसानंतर झेंडे यांनी ऑर्डर काढण्यासाठी २५ हजार रुपये साहेबांना देण्याचे कारण सांगून प्रगती झेंडेच्या खात्यावर ९ मार्च २०२० रोजी पैसे घेतले. तसेच कोळेकर यांचा विश्वास संपादन करण्यासाठी झेंडे याने ५ लाख रुपयांचा व बबन दळवी याने ४ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र दोन्ही धनादेश बाऊन्स झाल्यामुळे कोळेकर यांनी पैशाची वेळोवेळी मागणी केली. त्यामुळे आरोपींनी त्यांना १ लाख ३० हजार रुपये परत दिले. मात्र ३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली.

हेही वाचा- शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष; शरद पवार 9 डिसेंबरला घेणार राष्ट्रपतींची भेट

हेही वाचा- रोमहर्षक सामन्यात टीम इंडिया विजयी, मालिका खिशात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.