पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणीक नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यातच कोरोनाशी झुंज देताना अनेकांचा मृत्यूही होत आहे. पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आज आणखी पिंपरी-चिंचवड शहरात दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा- चिंताजनक : नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचे अर्धशतक पूर्ण..४८ तासांत आढळले २५ रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले असून आणखी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात सध्या एकूण ३४ कोरोना बाधित रुग्ण असून यापैकी १२ जणांना बरे करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तसेच त्यांना घरी पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती बरी आहे. शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता कायम आहे.
दरम्यान, २२ कोरोना बाधित रुग्णांवर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवडमधील ३ जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.