ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन चोरटे अटकेत, 20 गुन्हे उघडकीस - PCMC Police news

पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 170 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी दोन सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

जप्त मुद्देमालासह पोलीस पथक
जप्त मुद्देमालासह पोलीस पथक
author img

By

Published : Dec 29, 2020, 5:23 PM IST

Updated : Dec 29, 2020, 6:15 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडमधील 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पोलिसांनी सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दहा लाख रुपये किंमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने, 2 लाख 60 हजारांच्या दुचाकी, असा एकूण 12 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

खंडणी विरोधी पथक आणि चिंचवड पोलिसांच्या सयुंक्त पथकाने ही कामगिरी केल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. याप्रकरणी प्रभाकर येमनप्पा दोडमणी (वय 26 वर्षे, रा. आनंदनगर, चिंचवड) व अल्ताफ सलीम शेख (वय 19 वर्षे, रा. हांडेवाडी, हडपसर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना चोरटे करत होते लक्ष्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून मॉर्निंग वॉक करणाऱ्या एकट्या महिलांना लक्ष्य करून काही चोरटे सोनसाखळी हिसकावत असल्याचे गुन्हे घडले होते. त्याचा तपास करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ यांनी त्यांचे तीन आणि चिंचवडचे एक, अशी चार पथके तयार केली होती.

माहिती देताना पोलीस आयुक्त

सापळा रचून आरोपींना केली अटक

चारही पथके माहिती संकलित करत असताना पोलीस नाईक आशिष बोटके आणि स्वप्नील शेलार यांना माहिती मिळाली की, आरोपी आकुर्डी, निगडी, पिंपरी, चिंचवड परिसरात फिरत आहेत. त्यानुसार पोलीसांनी सापळा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींनी सुरुवातीला चिंचवड येथे दूध खरेदीसाठी आलेल्या एकाच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली. मात्र, त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी शहरात एकूण 15 ठिकाणी चेन हिसकावली आणि पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

20 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

चोरट्यांकडून पोलिसांनी 10 लाख रुपये किंमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने व 2 लाख 60 हजारांची 5 दुचाकी, असा एकूण 12 लाख 60 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे चेन चोरीचे 15 आणि वाहन चोरीचे 5, असे एकूण 20 गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक आरोपींवर या ठिकाणी आहेत गुन्हे दाखल

अटकेत असलेला प्रभाकर दोडमनी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर, पुणे रेल्वे, कर्नाटकातील हुबळी, गदग परिसरात जबरी चोरी, वाहन चोरीचे एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही आरोपींवर मोक्काची कारवाई केली जाणार असल्याचेही आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले.

हेही वाचा - चोरांना पाहून पोलीस पळाले, घटना सीसीटीव्हीत कैद

हेही वाचा - पुणे :कडाक्याच्या थंडीत आंब्याचा मोहोर बहरला!

Last Updated : Dec 29, 2020, 6:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.