ETV Bharat / state

Two Bulls Died Due to Electric Shock : भात लावणीसाठी चिखल करताना, विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा मृत्यू; गमबूटअसल्याने शेतकरी बचावले - Farmer Ramesh Valhekar luckily survived

पुणे जिल्हा परिसरात गेली सहा ते सात दिवसांपासून सतत पाऊस आहे. पुणेच्या ग्रामीण भागात आता भात शेतीची लगबग सुरू झाली आहे. पुण्यातील भोर तालुक्यात भात लावणीची लगबग जोरात आहे. अशातच भोर तालुक्यात हरिश्चंद्री गावात ( Harishchandri Village of Bhor Taluka ) भात लावणीसाठी चिखल करताना दोन बैलांचा मृत्यू ( Two Bulls Died Due to Electric Shock ) झाला. विजेच्या खांबातून वीजप्रवाह शेतातल्या पाण्यात उतरल्याने ( Electric Current Fell into Field Water ) ही घटना घडल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

Two Bulls Died Due to Electric Shock
विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 17, 2022, 8:43 AM IST

पुणे : पुण्यातल्या भोर तालुक्यातील हरिश्चंद्री गावात ( Harishchandri village of Bhor taluka ) शेतात भात लावणीसाठी चिखल करीत असताना विजेचा धक्का लागल्यानं दोन बैलांचा मृत्यू झाला ( Two Bulls Died Due to Electric Shock ). तर पायात गमबूट असल्यानं रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोघे शेतकरी सुदैवाने थोडक्यात ( Farmer Ramesh Valhekar Luckily Survived ) ( Farmer Dnyaneshwar Gade Luckily Survived )वाचले. खाचराच्या बांधावर असणाऱ्या विजेच्या खांबातून वीजप्रवाह शेतातल्या पाण्यात उतरल्याने ( Electric Current Fell into Field Water ) ही घटना घडली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या घटनेने शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आजूबाजूच्या परिसरात भात लावणीची लगबग : गेल्या आठवडाभरापासून भोर तालुक्यात पडत असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे भात लावणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची भात लावणीसाठीची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यातील हरिश्चंद्री गावातले शेतकरी रमेश वाल्हेकर आणि ज्ञानेश्वर गाडे हे दोघे भातलावणीसाठी बैलाच्या साह्याने पारंपरिक पद्धतीने शेतात चिखल करीत होते. या दरम्यान बांधावर असलेल्या विजेच्या खांबाचा वीजप्रवाह शेतातल्या पाण्यात उतरला. त्यामुळे विजेचा धक्का लागल्याने बैल अचानक खाली कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

गमबूट असल्याने शेतकरी बचावले : शेतकऱ्यांच्या पायात गमबूट असल्याने ते थोडक्यात बचावले. दरम्यान, बैलांना शॉक बसल्यावर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. मात्र, त्यांनाही शॉक बसू लागल्याने ते खाचराच्या बाहेर आले आणि त्यांचा जीव वाचला. खांबांना आर्थिंग नसल्याने वीज प्रवाह शेतातल्या पाण्यात उतरल्याने, महावितरणचा हलगर्जीपणामुळे बैलांचा जीव गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचे सावट : नुकताच बैलपोळा झाला होता. शेतकरी आपल्या बैंलांना कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे जीवापाड जपत असतो. मात्र, अचानक झालेल्या बैलांच्या मृत्यूने शेतकरी हळहळ व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर बैल गेल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे.

हेही वाचा : Ajit Pawar In Baramati : मुख्यमंत्री थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय करा- अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.