ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळा बाजार; दोघांच्या मुसक्या आवळल्या - रेमडेसिवीर तस्करी

कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एकूण ६ रेमडेसिवीर इंजेक्शन व इतर मुद्देमाल, असा एकूण किंमत रुपये १ लाख १९ हजार ७६९ रुपयेचा मुद्दे माल जप्त केलेला आहे. यातील दोन जणांवर दौंड पोलीस स्टेशन येथे तर एकावर नारायण गाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

रेमडेसिवीरचा काळा बाजार; दोघांच्या मुसक्या आवळल्या

author img

By

Published : Apr 25, 2021, 2:00 PM IST

दौंड (पुणे)- कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू आहे. यावर पोलिसांकडून कारवाईही केली जात आहे. त्याप्रमाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दौंड व वारुळवाडी नारायणगाव ( ता.जुन्नर) अशा दोन ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली.

या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एकूण ६ रेमडेसिवीर इंजेक्शन व इतर मुद्देमाल, असा एकूण किंमत रुपये १ लाख १९ हजार ७६९ रुपयेचा मुद्दे माल जप्त केलेला आहे. यातील दोन जणांवर दौंड पोलीस स्टेशन येथे तर एकावर नारायण गाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

काळाबाजारात विक्री होत असल्याची माहिती :

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी पुणे जिल्ह्यात कोरोना रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजार रोखण्यासाठी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दौंड गावच्या हद्दीत अक्षय राजेश सोनवणे आणि सुरज संजय साबळे ( रा . दौंड ) या दोघांनाही रेमडेसिवीर अधिकच्या दराने विक्री करताना सापडले. ते दोघे 32 हजार रुपयाला एक इंजेक्शन विकत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ३ रेमडेसिवीर इंजेक्शन आणि दोन मोबाईल किंमत २०,००० रुपये व होंडा अॅक्टीव्हा दुचाकी ( ७० हजार) असा एकूण ९ ७ हजार ८७९ रुपये किंमतीचा माल मुद्देमाल जप्त केला.

नारायणगाव येथे ३ इंजेक्शनसह एकाला पकडले -

नारायणगावजवळील मौजे वारुळवाडी ता.जुन्नर येथील राजाराम सबनिस विदयालयासमोर रोहन शेखर गणेशकर ( रा.वाणेवाडी पो.आपटाळे ता.जुन्नर जि.पुणे ) हा ३ रेमडेसिवीर इंजेक्शन प्रत्येकी 45,000 रुपये किंमतीला एक या दराने विक्री करीत होता. याच्या ताब्यातून 3 रेमडेसिवीर इंजेक्शन आणि मोबाईल असा मुद्देमाल पोलीस पथकाने जप्त केला आहे.

दौंड व नारायण गाव पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल -
या आरोपीवर दौंड पोलीस स्टेशन आणि एका आरोपीवर नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

कामगिरी करणारे पथक -

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील , बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट , सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे , पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे , सहा . फौ . शब्बीर पठाण , पोलीस हवालदार महेश गायकवाड , निलेश कदम , सचिन गायकवाड ,सुभाष राऊत , गुरु गायकवाड ,मुकेश कदम , दत्ता तांबे ,सागर चंद्रशेखर , काशिनाथ राजापुरे , दगडू विरकर यांनी केलेली आहे .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.