ETV Bharat / state

पुण्यातील घोरपडे पेठेत इमारतीचा काही भाग कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही - three story old building

इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर सात कुटुंबे राहत होती. त्या सर्वांना खाली आणण्यात आले आहे.

old building collapsed in pune no casualties reported
author img

By

Published : Jul 29, 2019, 9:58 AM IST

Updated : Jul 29, 2019, 12:25 PM IST

पुणे - शहरातील घोरपडे पेठेतल्या एका तीन मजली जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशामक विभागाकडून सांगण्यात येत आहे.

पुण्यातील घोरपडे पेठेत इमारतीचा काही भाग कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेतील राष्ट्र भूषण चौकातल्या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना रविवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेण्यात आली. तिसर्‍या मजल्यावर सात कुटुंबे राहत होती. त्या सर्वांना खाली आणण्यात आले.

लाकूड आणि माती वापरुन केलेले जुने बांधकाम असल्यामुळे इमारतीचा काही भाग पडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, आता पुणे महापालिकेमार्फत धोकादायक भाग पाडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:

पुण्यातील घोरपडे पेठेतील इमारतीचा काही भाग कोसळला 

पुण्यातील घोरपडे पेठेतील तीन मजली जुनी इमारतीचा काही भाग कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवतहानी झाली नसल्याचे अग्निशामन विभाग मार्फत सांगण्यात आले आहे. 

अग्निशामन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेतील राष्ट्र भूषण चौकातील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला असल्याची माहिती काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मिळाली. या घटनेची माहिती मिळताच काही मिनिटात घटनास्थळी धाव घेण्यात आली. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिसर्‍या मजल्यावर सात कुटुंब राहत होते. त्या सर्वाना खाली आणण्यात आले असून लाकडी आणि मातीच जुन बांधकाम आहे. त्यामुळे इमारतीचा काही भाग पडला असावा. तसेच आता पुणे महापालिकेचा घरपाडी विभागा मार्फत धोकादायक भाग पाडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Conclusion:
Last Updated : Jul 29, 2019, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.