ETV Bharat / state

Bhima River Suicide: त्या सात जणांची आत्महत्या नव्हे तर खून महिलेला पळवल्याचा राग चुलत भावाने केले कांड

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. भीमा नदी पात्रात सात मृतदेह सापडले. एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक वळण लागले आहे. या सर्व आत्महत्या नव्हे तर, खून असल्याचे समोर आले आहे. चुलत भावाने महिलेला पळवल्यामुळे हे कांड केल्याचे समोर आले आहे.

Family Suicide In Pune District
दौंड ७ जण आत्महत्या प्रकरणा
author img

By

Published : Jan 25, 2023, 12:28 PM IST

पुणे : नदी पात्रात 7 मृतदेह सापडल्या नंतर पोलीसांनी चार जणांना संशयित ताब्यात घेतले. मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी आणि जावई त्यांची मुलीची 3 मुले यांचे मृतदेह नदीत सापडले होते. 17 तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचे समोर आले होते. परंतु नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता.

चार जणांवर गुन्हा : त्यावर पोलीसांनी तपास केला. मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यावरून पोलीसांनी चार जणांवर गुन्हा नोंद करून अटक केली आहे. यात मोहन उत्तम पवार (वय 50 वर्षे) संगीता मोहन पवार (वय 45 वर्षे, दोघे रा. खामगांव ता. गेवराई) त्यांचे जावई शामराव पंडित फुलवरे (सुमारे वय 32 वर्षे) त्यांची पत्नी राणी शामराव फुलवरे (सुमारे वय 27 वर्षे) शामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय 7 वर्षे) छोटू शामराव फुलवरे (वय 5 वर्षे) आणि कृष्णा (वय 3 वर्षे) असे एकूण 7 जणांचे मृतदेह या नदीपात्रात आढळून आले आहेत.

नक्की काय घडले : पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपात्रात सलग पाच दिवसात चार मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. १८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान हे मृतदेह सापडले होते. मृतदेह एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात होती. 18 जानेवारीला मासेमारी करत होते. त्यावेळी त्यांना पुण्यातील भीमा नदीत एका स्त्रीचा मृतदेह त्यांना आढळून आला होता. तसेच २० जानेवारीला अजून एका पुरुषाचा मृतदेह आढळला होता. तसेच 21 तारखेला पुन्हा एका स्त्रीचा मृतदेह आढळला होता. लगेच 23 तारखेला पुन्हा पुरुषाचा मृतदेह आढळला होता.

महिलेला पळवल्याचा राग : पवार यांच्या मुलाने विवाहित महिलेला पळवून नेले होते. मात्र, या महिलेला घरी घेण्यास पवार कुटुंबीयांनी विरोध केला, त्या महिलेला तिच्या घरी सोडून ये. आपण आपल व्यवस्थित राहू, या महिलेला घरी सोडवण्यासाठी एक दिवसाचा कालावधी देखील दिला होता. जर तू या महिलेला घरी सोडवले नाही तर आम्ही सर्वजण आत्महत्या करू, असा इशाराही कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाला दिला होता. मात्र, पवार यांच्या मुलाने एकले नाही आणि या कुटुंबातील सात जणांनी भीमा नदीत उडी मारून आत्महत्या हत्या केल्याची माहिती समोर येत होती. मोहन पवार हे आपल्या कुटुंबीयांसोबत निघोज (ता. पारनेर) येथे मागील एक वर्षांपासून मजुरीचे काम करत होते. मात्र आता या प्रकरणात ही आत्महत्या नसुन हा तर खुन होता आणि तो चुलत भावांनी केल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : Aurangabad Crime : विवाहितेची स्कार्फने गळफास घेत आत्महत्या, चिमुकलीच्या रडण्याच्या आवाजाने घटना उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.