पुणे - शेतीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा करत असताना तज्ञ लोकांसह शेतकऱ्यांशी विचारविनिमय करून कायदा करायला हवा होता. मात्र, हा कायदा घाईघाईत करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची आवश्यकता होती. मात्र, ती न करतात हा कायदा लागू करण्यात आला, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्र्याचे नाव समोर आल्याने प्रकरणाला गंभीर वळण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या बारा फुटी पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला रोहित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सदर मत व्यक्त केले.
केंद्र सरकारकडून कायद्यात सुधारणा करण्याची अपेक्षा
केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांसंदर्भात येणाऱ्या काळात मोठ्या अडचणी येऊ शकतात, असे शेतकऱ्यांचे व तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सध्या केंद्र सरकारचे शेतकऱ्यांसंबंधीचे वागणे हे योग्य नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत कायद्यात सुधारणा करेल, अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
हेही वाचा - दिल्लीतील शेतकरी आंदोलन रेटण्याचा प्रयत्न- रामदास आठवले