ETV Bharat / state

पीएम केअर फंडातून पुणे शहराला मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब

author img

By

Published : Apr 11, 2021, 4:53 PM IST

शहरात आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात पीएम केअर फंडातून पुणे शहराला मिळालेले तब्बल 58 व्हेंटिलेटर खराब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या ससून रुग्णालयातील हे व्हेंटिलेटर आहेत.

File photo
File photo

पुणे - शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे येथील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र आहे. शहरात आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात पीएम केअर फंडातून पुणे शहराला मिळालेले तब्बल 58 व्हेंटिलेटर खराब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या ससून रुग्णालयातील हे व्हेंटिलेटर आहेत.

शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत यांच्या झालेल्या बैठकीत ससून रुग्णालयाच्या डीनने ही बाब निदर्शनास आणून दिली.

शहरात सुरुवातीपासूनच व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून पुण्याला पुन्हा एकदा 165 व्हेंटिलेटर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे व्हेंटिलेटर येईपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा वाट पहावी लागणार आहे. परंतु याआधी पीएम केअर फंडातून मिळालेले तब्बल 58 व्हेंटिलेटर खराब झाल्यामुळे ससून रुग्णालयातील स्थिती गंभीर आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील व्हेंटिलेटर खराब झाल्याचे मान्य केले आहे. हे व्हेंटिलेटर लवकरात लवकर दुरुस्त करून पुन्हा रुग्णांच्या सेवेत आणले जातील असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे. यावरून कुणीही राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.