संगमनेर - तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात टोमॅटो घेवून जाणारा आयशर टेम्पो उलटल्याने एकजण जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. विष्णू पांडुरंग उंबरे (३५, रा. गारडगाव, ता. सिन्नर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आयशर टेम्पो हा टोमॅटो घेवून पुणे येथून आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होता. शनिवारी दुपारी हा टेम्पो पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात पलटी झाला. यामध्ये जागेवरच एकजण ठार झाला. घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस नाईक अरविंद गिरी, संजय मंडलिक, कैलास ठोंबरे, उमेश गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या महार्गावरील एक वाहतूकलाइन बंद करण्यात आली.
हेही वाचा- मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली उपसमितीची महत्वाची बैठक