ETV Bharat / state

पाचाडाच्या खोपीत अभ्यास करून ऊसतोड कामगाराच्या मुलाने मिळवले ९३.८० टक्के - दहावी परीक्षा

प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत मोठे यश मिळवलेल्या शंकरचे उदाहरण अनेकांनी प्रेरणा घेण्यासारखे नक्कीच आहे..

पुणे
author img

By

Published : Jun 15, 2019, 7:05 PM IST

Updated : Jun 15, 2019, 9:39 PM IST

पुणे - गरीबी शिक्षणाच्या आड येत नाही..! तर गरिबीवर मात करून शिक्षणाच्या वाटेवर यशस्वी झेंडा लावण्यासाठी गरज असते ती जिद्द अन् चिकाटीची.. या चिकाटीतून आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगाराच्या मुलाने दहावीत 93.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पुणे
आपल्या मुला-बाळांसहित कारखान्याच्या स्थळावर गेली 16 वर्षे उसतोड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे घोरपडे कुटुंब आहे. त्यांचा शंकर हा मुलगा 10 वीत श्री संगमेश्वर माध्यमिक कै. बाबुराव गेणूजी कनिष्ट महाविद्यालय येथे शिक्षण पूर्ण करत आहे. दहावीच्या परीक्षेत शंकरने रात्रं-दिवस अभ्यास करून आणि आपल्या आई-वडिलांना उस तोडणीच्या कामात मदत करून 93.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. त्याच्या ह्या यशाचे सर्वजण कौतुक करत आहेत.मराठवाडा व विदर्भ या भागातून दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंब साखर कारखान्यांवर ऊसतोड कामगार म्हणून काम करत आहेत. आपले गाव शेत सारे काही सोडून वर्षानुवर्षे ऊसतोडीचे काम हे ऊसतोड कामगार करत असतात. यामध्ये त्यांच्या मुलांची मोठी फरफट होते. मात्र, यावरही मात करत ऊसतोड कामगाराच्या मुलाने दहावीत यशाचे शिखर गाठले. त्यामुळे संपूर्ण गावासह विद्यालयातील शिक्षकांनी शंकरचे कौतुक केले.पहाटेपासून आई-वडिलांसोबत शंकरही कामाला सुरुवात करायचा. काबाड कष्ट अन् मेहनत ही या मुलांच्या पाचवीलाच पुजलेली असताना आपण यशस्वी शिखर घाटायचे याची जिद्द मनात ठेवून शंकर अभ्यास करायचा. त्यात आई-वडिलांची साथ तर शिक्षकांची प्रेरणा उराशी घेऊन भिमाशंकर साखर कारखान्याच्या मदतीतून शंकरने मोठे यश संपादन केले.

Intro:Anc__ गरीबी शिक्षणाच्या आड येत नाही..! तर गरिबीवर मात करून शिक्षणाच्या वाटेवर यशस्वी झेंडा लावण्यासाठी गरज असते ती जिद्द अन चिकाटीची.. या चिकाटीतून आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर साखर कारखान्याज्या ऊसतोड कामगारांच्या मुलांने दहावीत यश मिळवून 93.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे

Vo__आपल्या मुलाबाळांना सहित कारखान्या स्थळावर गेली 16 वर्षे उसतोड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे घोरपडे कुटुंब आहे.त्याचा शंकर हा मुलगा 10 वीत श्री संगमेश्वर माध्यमिक कै.बाबुराव गेणूजी कनीष्ट महाविद्यालय येथे शिक्षण पूर्ण करीत आहे दहावी च्या परीक्षेत शंकर ने रात्र दिवस अभ्यास करून या शिवाय आपल्या आई वडिलांना उस तोडणी च्या कामात मदत करून 93.80 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला आहे त्याच्या ह्या यशाचे कौतुकच केले जात आहे

Byte__ भागवत घोरपडे__ शंकरचे वडील

Vo__मराठवाडा व विदर्भ या भागातून दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंब साखर कारखान्यांवर ऊसतोड काम कामगार म्हणून काम करत आहे आपलं गाव शेत सारं काही सोडून वर्षानुवर्ष ऊसतोडीचे काम हे ऊसतोड कामगार करत असतात यामध्ये मुलांची मोठी फरफट होते मात्र या यावरही मात करत या ऊसतोड कामगारांच्या मुलांना दहावी यशाचे शिखर गाठले या मुलाच्या संपूर्ण गावासह महाविद्यालयातील शिक्षकांना कौतुक केलय

Byte__ किरण ढोबळे वर्ग शिक्षक

Byte___ कैलास येलभर प्राचार्य शिक्षक

Vo__पहाटेपासुन आईवडीलांसोबत कामाला सुरुवात करुन शंकर आपल्या अभ्यासाची सुरुवात करत काबाड कष्ट अन मेहनत हि या मुलांच्या पाचीलाच पुंजलेली असताना आपण यशस्वी शिखर घाटायचे हिच जिद्द मनात ठेवुन शंकरने अभ्याला सुरुवात केली त्यात आई-वडिलांची साथ तर शिक्षकाची प्रेरणा उराशी घेऊन भिमाशंकर साखर कारखान्याची मदतीतुन शंकरने यशाचे शिखर घाटले..

Byte __शंकर घोरपडे__ विद्यार्थी

Byte __बाळासाहेब बेंढे ..उपाध्यक्ष कारखाना.

End vo_पाचाडाच्या कोपीत अभ्यास करून उसतोड कामगाराच्या मुलाने मिळविले हे यश आजच्या प्रत्येक मुलांसमोर एक आदर्शच आहे.

.Body:...स्पेशल पँकेज स्टोरीConclusion:
Last Updated : Jun 15, 2019, 9:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.