पुणे- शैक्षणिक मागण्यांकडे कृषी महाविद्यालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाविद्यालयातील ६५० विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर धरणे दिले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत, धरणे कायम ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या प्रशासनाची त्वरित बदली करावी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे १२५० रुपये त्वरित परत करावे, विद्यार्थ्यांचे स्टायपेंड त्वरित द्यावे, ग्रंथालय २४ तास सुरू करून कायमस्वरूपी ग्रंथपाल नियुक्त करावा, मुलींचे वस्तीगृह बांधकाम त्वरित जलद गतीने पूर्ण करावे, महाविद्यालयाचे मैदान इतर कोणालाही भाडेतत्वावर देऊ नये, उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर अक्साना कारवाई करू नये, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे.
मात्र, या प्रकरणी महाविद्यालयाने स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांनी आमच्याशी संवाद कारणे गरजेचे आहे. आमच्याशी चर्चा केल्यास मागण्या त्वरित मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. शैक्षणिक सहलींचे काही विद्यार्थ्यांना पैसे मिळाले आहेत. ज्यांचे स्टेट बँकेत खाते आहेत त्या विद्यार्थ्यांना पैसे मिळाले आहेत. मात्र, इतर बँकेत खाते असलेल्या विद्यार्थ्याचे पैसे राहिले असून ते लवकरच त्यांना मिळेल. तर, ग्रंथपालाची जागा रिकामी असून ती लवकरच भरण्यात येईल. त्याचबरोबर, सीसीटीव्ही त्यांच्या सुरक्षेसाठी असून मैदान मुलांसाठीच आहे. मात्र, ते रिकामे असेल तरच भाड्याने दिले जात असल्याचे प्रशासनाने सांगितेल आहे.
हेही वाचा- वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी घातला ट्रॅक्टर; पाच जणांना अटक