पुणे : मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सामंत ( State Industries Minister Uday Samant ) यांचे शिक्षण डिप्लोमा ऑटोमोबाईल हि डीग्री ( uday samant bogus degree certificate ) ज्ञानेश्वर विद्यापीठ पुणे या ठिकाणाहून शिक्षण घेतल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. ज्ञानेश्वर विद्यापीठाला कोणत्याही स्वरूपाची विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसलेले हे विद्यापीठ आहे. (Discussion in winter session 2022 ) त्यामुळे या विद्यापीठाला शासनाने यापूर्वीच बनावट विद्यापीठ म्हणून घोषित केलेला आहे. (Winter session 2022)
सामंतांना टार्गेट केले जाण्याची शक्यता : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत असून अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांची शैक्षणिक डिग्री ही बोगस विद्यापीठातून घेतले असल्याचे माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या विद्यापीठाला कुठल्याही प्रकारची शासकीय मान्यता नाही. परंतु ज्यावेळेस निवडणूक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले त्यामध्ये या बोगस डिग्रीचा उल्लेख राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाला असून अधिवेशनात आता उदय सामंत यांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून ही डिग्री ( bogus diploma degree in engineering) त्याने घेतलेली आहे.
कोर्टाच्या नोटिसीमुळे ज्ञानेश्वर विद्यापीठ बंद : ज्ञानेश्वर विद्यापीठ हे 1980 मधील पुण्यात नवी पेठ येथे डाॅ.एम,डी. आपटे यांनी स्थापन केलेले एक खासगी विद्यापीठ होते. त्यात इंजिनिअरिंगचे प्रात्यक्षिक स्वरूपाचे कार्यानुभवावर आधारित शिक्षण देण्यात येई. इ.स. 2001 पर्यंत विजय भटकर या विद्यापीठाचे कुलगुरू होते. पुढे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू झालेल्या स्नेहलता देशमुख विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर होत्या. हे विद्यापीठ सरकारमान्य नसल्याने कोर्टाच्या नोटिसीमुळे 2006 साली बंद ( Dnyaneshwar University closed ) करावे लागले.
किरीट सोमय्या यांच्या पदवीची ही अधिवेशनात चर्चा : युवा सेनेच्या सिनेट सदस्याकडून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या ( Bhartiya Janata Party leader Kirit Somaiya ) यांनी 2005 साली घेतलेल्या डॉक्टरेट पदवी बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या डिग्री बाबत शंका निर्माण होत असल्याने, मुंबई विद्यापीठाने या संबंधित खुलासा करावा. याबाबतचे पत्र मुंबई विद्यापीठाला दिले होते. यासोबतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना देखील याबाबतची विचारणा करण्यात आली होती. तर तेथेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही युवा सेनेच्या सिनेट सदस्यांकडून पत्र देऊन याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोठूनही प्रतिसाद मिळत नसल्याने सिनेट सदस्यांचा आहे. युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत राजन कोळंबेकर, प्रवीण पाटकर, मिलिंद साटम यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून किरीट सोमय्या यांच्या डिग्रीबाबत विचारणा केली होती.