ETV Bharat / state

जाणून घ्या.. कोरेगाव भीमामध्ये २०० वर्षांपूर्वी नेमके काय घडले होते? - कोरेगाव भिमा स्पेशल रिपोर्ट

1 जानेवारी या दिवशी कोरेगाव भिमा येथे झालेली लढाई इतिसाहात प्रसिद्ध आहे. हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा होत केला जातो. 2020 मध्ये या लढाईला 202 वर्ष पूर्ण होत आहेत. दोनशे वर्षांपूर्वी नेमके काय घडले होते याबाबत एक स्पेशल रिपोर्ट...

कोरेगाव भिमा
कोरेगाव भिमा
author img

By

Published : Dec 24, 2019, 4:33 PM IST

पुणे - कोरेगाव भिमामध्ये दोन वर्षापूर्वी घडलेल्या घटनेने संपुर्ण राज्याचेच नाही तर देशाचेही वातावरण ढवळून निघाले होते. 1 जानेवारी या दिवशी कोरेगाव भिमा येथे झालेली लढाई इतिसाहात प्रसिद्ध आहे. हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा होत केला जातो. 2020 मध्ये या लढाईला 202 वर्ष पूर्ण होत आहेत. या शौर्य दिनाचा नेमका काय इतिहास आहे? दोनशे वर्षांपूर्वी नेमके काय घडले होते याबाबत एक स्पेशल रिपोर्ट...

कोरेगाव भिमा स्पेशल रिपोर्ट

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथे भीमा नदीच्या काठावर 1 जानेवारी 1818 ला दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये लढाई झाली. इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री या सैनिकांच्या तुकडीत 500 सर्व जाती-धर्मांचे सैनिक होते. या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला 12 तास रोखून धरले. इंग्रजांची आणखी मोठी फौज येत असल्याची माहिती पेशव्यांना मिळाली. त्यामुळे पेशव्यांनी लढाईतून काढता पाय घेतला. परिणामी इंग्रजांचा विजय झाला.

हेही वाचा - पुण्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे हा पेशव्यांचा बालेकिल्ला होता मात्र, पुण्यावर ब्रिटिशांच्या सत्तेची पकड बसली होती. ती परत मिळवण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे प्रचंड मोठ्या फौज फाट्यासह पुण्यावर चाल करण्यासाठी निघाले. याची माहिती मिळताच इंग्रजांनीही पेशव्यांशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली. पेशव्यांकडे 28 हजारांचे सैन्य होते. तर इंग्रजांकडे फक्त 800 सैनिक होते, असा दावा इतिहासकार करतात. कॅप्टन फ्रांन्सिस एफ. स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी ही लढाई केली.

या लढाईत इंग्रजांच्या 275 सैनिकांचा आणि पेशव्यांच्या सुमारे 600 सैनिकांचा मृत्यू झाला, असे दाखले अनेक पुस्तकांमधून देण्यात येतात. या लढाईमध्ये महार सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळेच इंग्रजांना विजय मिळाला. त्या विजयाचे प्रतिक म्हणून इंग्रजांनी भीमा-कोरेगावमध्ये विजय स्तंभ उभारला. त्यावर लढाईमध्ये धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नावे कोरली. तेव्हापासून विजयस्तंभाजवळ शौर्य दिवस साजरा केला जातो.

पेशाव्यांच्या राजवटीत दलितांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात असे. दलितांना त्यांचे मुलभूत अधिकारही नाकारले जात होते. त्याची प्रचंड सल दलितांच्या मनात होती. त्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी महार सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि पेशव्यांचा पराभव केला. याचीही किनार या विजयाला असल्याने दलित समाजाच्या नजरेत या दिवसाचे महत्त्व आहे.

Intro:Anc_ कोरेगाव भिमाच्या दोन वर्षापूर्वीच्या घटनेने महाराष्ट्राचच नव्हे तर देशाचं वातावरण ढवळून निघालं.1 जानेवारी 2020 रोजी कोरेगाव भिमाची लढाई म्हणून इतिसाहास प्रसिद्ध असलेल्या या लढाईतल्या विजय शौर्यदिवस म्हणुन साजरा होत असुन या शौर्यविजयाला 202 वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे ही लढाई पुन्हा एकदा इतिहासातून वर्तमानात येऊन मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे या शौर्यदिनाचा नेमका काय आहे हा इतिहास, दोनशे वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं त्याचा स्पेशल रिपोर्ट...

पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भिमा इथं भीमा नदीच्या काठावर 1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये हे युद्ध झालं. दोन्ही सैन्याचे समोरासमेर तुंबळ युद्ध झालं. इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री या सैनिकांच्या तुकडीत 500 सर्व जातीय सैनिक होते. या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला 12 तास रोखून धरलं. एक इंचही पुढे सरकू दिलं नाही. इंग्रजांची आणखी मोठी फौज येत असल्याची माहिती पेशव्यांना मिळाली त्यामुळं पेशव्यांनी आहे त्या परिस्थितीत युद्धातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आणि ब्रिटिशांचा विजय झाला. या लढाईत इंग्रजांच्या 275 सैनिकांचा मृत्यू झाला तर पेशव्यांचे 600 च्या आसपास सैनिक मृत्यूमुखी पडले असे दाखल अनेक ऐतिहसिक पुस्तकांमधून देण्यात येतात. हा लढाई जिंकण्याचा दिवस म्हणजे 1 जानेवारी 1818 ची पहाट होती. या लढाईत महार सैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्यामुळेच विजय मिळाला. त्या विजयाचं प्रतिक म्हणून इंग्रजांनी भीमा-कोरेगावमध्ये विजय स्तंभ उभारला आणि त्यावर युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नावं कोरली.तेव्हापासून आज पर्यत विजयस्तंभाजवळ शौर्यदिवस साजरा केला जातो.

पुणे म्हणजे पेशव्यांचा बालेकिल्ला होता मात्र पुण्यावर ब्रिटिशांच्या सत्तेची पकड बसली होती ती परत मिळवण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे प्रचंड मोठ्या फौज फाट्यासह पुण्यावर चाल करण्यासाठी निघाले. याची माहिती मिळताच इंग्रजांनीही पेशव्यांशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली. पेशव्यांकडे 28 हजारांचं सैन्य होतं तर इंग्रजांकडे 800 च्या आसपास सैनिक होते असा दावा इतिहासकारांनी केलाय. कॅप्टन फ्रांन्सिस एफ. स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हे युद्ध लढवलं होते मात्र या युद्धात महार समाज्यातील सैनिकांच्या शौर्यामुळे हा विजय मिळवता आला.

पेशाव्यांच्या राजवटीत त्या काळात दलितांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात असे. दलितांना त्यांचे मुलभूत अधिकारही नाकारले जात होते. त्याची प्रचंड सल दलितांच्या मनात होती. त्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी महार सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि ते लढले आणि पेशव्यांचा पराभव केला. याचीही किनार या विजयाला असल्याने दलित समाजाचा या विजयाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन आहे.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.