पुुणे- आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १ महिला आणि ६ पुरुषांचा समावेश आहे. नव्याने कोरोनाची बाधा झालेले २६८ रुग्ण सापडले आहेत. तर आज कोरोनामुक्त झालेल्या २०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले ८ हजार ७७७ रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या ५ हजार ७८२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बरे झालेल्या २०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही २ हजार ५८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर ४१३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आठ हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत आहे. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.
पुण्यात दिवसभरात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू, २०७ जणांना डिस्चार्ज, २६८ नवीन रुग्ण - Pmc
सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आठ हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत आहे.