ETV Bharat / state

Shivaji Maharaj Rajgad Fort : बैलांसाठी तयार केली चाऱ्यापासून राजगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती - कडब्यापासून राजगडाची प्रतिकृती

पेठ (ता. आंबेगाव) येथील शेतकरी शिवाजी पवळे यांनी उन्हाळ्यात बैलांच्या सावलीसाठी ज्वारीचा कडबा, वांडे, बांबू, वडाच्या पारंब्यांपासून बनवलेला मांडव तयार केला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत पूर्वेला वायरलेस पोलीस केंद्राजवळ पवळे यांनी यावर्षी तसेच राजगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती साकारली ( Rajgad fort replica has been made from ox fodder at Pune ) आहे.

Shivaji Maharaj Rajgad Fort
राजगडाची प्रतिकृती
author img

By

Published : May 26, 2022, 5:22 PM IST

पुणे - सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे आपल्या पशुधनाचे तीव्र उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातल्या पेठमधील शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने त्यांच्यावर मायेची सावली देण्याचा प्रयत्न केला आहे. बैलांसाठी पेंढ्यापासून मेघडंबरी बनवली असून, त्यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. स्वराज्य राजधानी असणाऱ्या राजगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती येथे साकारण्यात आली ( Rajgad fort replica has been made from ox fodder at Pune ) आहे.

राजगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती साकारली - पेठ (ता. आंबेगाव) येथील शेतकरी शिवाजी पवळे यांनी उन्हाळ्यात बैलांच्या सावलीसाठी ज्वारीचा कडबा, वांडे, बांबू, वडाच्या पारंब्यांपासून बनवलेला मांडव तयार केला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत पूर्वेला वायरलेस पोलीस केंद्राजवळ पवळे यांनी यावर्षी तसेच राजगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती साकारली आहे.

बैलांसाठी तयार केली चाऱ्यापासून राजगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती

अडीच महिन्यांत बांधण्यात आला - हा मांडव बनवण्यासाठी तब्बल १६०० हून अधिक ज्वारी कडब्याच्या पेंढ्या, तीनशेहून अधिक बांबू, पारंब्यांचा वापर केला असून, हा मांडव बांधण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागला. बैलगाडा शर्यतीच्या बैलांसाठी हा मांडव तयार केला असून, या मांडवासाठी ज्वारीचा कडबा, बांबू आणि वडाच्या पारंब्यांचा वापर करण्यात आला आहे.

Raigad fort replica has been made from ox fodder at Pune
चाऱ्यापासून राजगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती बनवली

पवळे कुटुंबाचा २४ वर्षांपासून उपक्रम सुरू - सध्या बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला सध्या आलेली बळकटी आली आहे. या मांडवाजवळ बैलगाडा शर्यतीला शासनाने लावलेल्या नियम अटीचे फलक लावले आहेत. यामुळे जनजागृती होऊन एकप्रकारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सलग २४ वर्षांपासून अशा प्रकारचा मांडव दरवर्षी उन्हाळ्यात ते बनवतात. सध्या येथे सहा बैल आणि एक घोडी आहे. या मांडवावर शिवराजमुद्रा देखील केला आहे.

हेही वाचा - Throated Lizard : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पठारावर आढळला रंगीत गळ्याचा सरडा, पाहा सुंदर फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.