ETV Bharat / state

पुणे :कडाक्याच्या थंडीत आंब्याचा मोहोर बहरला!

आंब्याला डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून बहर लागला आहे. सध्याचे वातावरण आम्रमोहर टिकण्यासाठी पोषक आहे.

आंबा मोहोर
आंबा मोहोर
author img

By

Published : Dec 29, 2020, 3:23 PM IST

Updated : Dec 29, 2020, 3:54 PM IST

शिरूर (पुणे)- सध्या सर्वत्र कडाक्याच्या थंडीची हुडहुडी सुरू झाली आहे. याच थंडीमुळे शिरुर तालुक्यात आंब्याला चांगलाच मोहोर भरला आहे.

जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर तालुक्यात आंब्याचे सर्वाधिक उत्पादन घेण्यात येत आहेत. मागील वर्षी वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादनात घट झाली होती. उत्पादित झालेला आंबा टाळेबंदीमुळे विक्री झाला नव्हता. त्यामुळे आंबा उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. यंदा आंब्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे कडाक्याची थंडीने आंब्याच्या मोहरला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचे आंब्याचे उत्पादन वाढणार असल्याचे आंबा उत्पादक शेतकरी गीताराम कदम सांगतात.

कडाक्याच्या थंडीत आंब्याचा मोहोर बहरला!

आंब्याचा मोहोर टिकण्यासाठी मधमाशांचे काम महत्त्वाचे-
आंब्याला डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून बहर लागला आहे. सध्याचे वातावरण आम्रमोहर टिकण्यासाठी पोषक आहे. यादरम्यान झाडांना पाणी व वातावरणातील बदलानुसार फवारणी करण्याची गरज आहे. आंब्याला आलेला मोहोर टिकवण्यासाठी मधमाशा महत्त्वाचे काम करत असतात. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आंबा बागेत मधुमक्षिका पालन करावे, त्यामुळे आंब्याला आलेला भर टिकून राहतो. तसेच रोगराई पसरत नसल्याचे शेतकरी कदम यांनी सांगितले. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन वाढणार असल्याने आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा-पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार - अजित पवार

कोकोणातील वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादक चिंतेत
यावर्षीच्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्याच्या मनावरचे चिंतेचे ढग आणखी गडद झाले आहेत. ढगाळ वातावरण असल्याने पालवी तसेच मोहोरावर तुडतुडा, बुरशी तसेच कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. त्यातच पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या फवारणीचा खर्च ही वाया गेला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा-केंद्राकडून कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध रद्द

Last Updated : Dec 29, 2020, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.