पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. अजित पवार यांचे बंड झाल्यानंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात आता शरद पवार आणखी सक्रिय होणार आहेत. त्याबाबतची वेळ शरद पवार यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आहे. या सभेमध्ये शरद पवार काय बोलणार याची आता उत्सुकता लागलेली आहे.
भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांचे पुणे दौरे वाढलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर आले होते. हा सामाजिक ट्रस्टचा कार्यक्रम असूनही त्याविषयी मोठी चर्चाही झाली. परंतु कुठल्याही भाष्य या दोन्ही नेत्याने त्यावेळेस केले नव्हते. परंतु गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचीच अजित पवार यांच्या बंडाला साथ आहे, अशी राजकीय चर्चा आहे. मात्र, शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
इंडियाच्या बैठकीपूर्वी शरद पवारांची पुण्यात बैठक- शरद पवार हे विरोधकांच्या इंडिया या आघाडीसोबत आहेत. 31 ऑगस्टला इंडिया आघाडीची मुंबईमध्ये बैठक होत आहे. याचे संयोजक पद शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे आहे. त्यापूर्वीच शरद पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. ते 17 ऑगस्टला ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे अजित पवारसुद्धा सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट पुण्यात ताकद लावण्याचा प्रयत्न करत आहे.
राष्ट्रवादीकडून सभेची तयारी सुरू- स्वतःच्या जिल्ह्यामध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. ते सर्व कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, मनात संभ्रम ठेवू नका मी तडजोड करणार नाही. भाजपासोबत जाणार नाही. आपल्याला भाजपा विरुद्ध लढायचे आहे. शरद पवार यांच्या सभेची तारीख निश्चित झाली नाही. तरी शेवटच्या ऑगस्ट महिन्याच्या आठवड्यात, मी सहभाग घेईल असा शब्द त्यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना दिला आहे. त्याची तयारीसुद्धा केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जगताप यांनी दिली आहे.
हेही वाचा-