पुणे - पोलीस आल्यावर चोर पळून गेले असे आपण अनेकदा ऐकले असेल. पण पुण्यात चोरांना पाहून त्यांना पकडण्याऐवजी पोलिसच पळून गेल्याची घटना घडली आहे. पुण्यातील औंध परिसरातील सिद्धार्थनगर भागात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
नेमके काय घडले?
सिद्धार्थनगरातील शैलेश टॉवर सोसायटीत मध्यरात्री तीनच्या सुमारास चार चोरटे शिरले. त्यातील दोघांनी वॉचमनला चाकूचा धाक दाखवून पकडून ठेवले तर इतर दोघांनी सोसायटीत प्रवेश करून कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चोरट्यांच्या या हालचाली सोसायटीतील एका व्यक्तीने पाहिल्या आणि तात्काळ पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी चोरांना पाहिलेही, पण या चोरांना पकडण्याऐवजी पोलिसच पळून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादी नगरसेवकाच्या खुनाची सुपारी, येरवड्यात रचला कट