ETV Bharat / state

पुण्यात कोरोनाची दुसरी लाट; जिल्हा परिषद घेणार टीबी व छातीचे आजार असणाऱ्या व्यक्तींचा शोध

author img

By

Published : Nov 27, 2020, 4:37 PM IST

आयुष प्रसाद पुणे जिल्ह्याचा दौरा करून याबाबत नियोजन करत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना कुठल्या प्रकारची लक्षणे असणार, याबाबत अद्याप माहिती नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व आरोग्य विभागाकडून 13 तालुक्यांतील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली टीम तयार करण्यात येणार आहे.

आयुष प्रसाद
आयुष प्रसाद

पुणे - जिल्हा परिषद व आरोग्य विभागाची यंत्रणा कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी तयारीला लागली आहे. जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाने 1 ते 31 डिसेंबर या दरम्यान एकसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. टीबी व छातीचे आजार असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी तुमच्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद यांनी नागरिकांनी केले आहे.

आरोग्य विभाग टिमच्या माध्यमातून टीबी व छातीचे आजार याबाबत तपासणी करणार आहे. कोरोनाची दुसरी लाट व आरोग्यासंदर्भात पुढील काळातील धोका लक्षात घेऊन, तपासणी कार्यक्रम हाती घेतला आहे. तपासणीतून निदर्शनास येणाऱ्या आजारांवर शासनाच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा परिषदेची मोहिम

मोदींचा पुणे दौरा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार असून ते सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्या भागीदारीतून कोरोना लस तयार करण्याचे काम सुरू आहे. ही लस 90 टक्के परिणामकारक असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.