ETV Bharat / state

Satyaki Savarkar Defamation Suit: राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे सावरकर समर्थक, कुटुंबाच्या भावना दुखावल्या- सात्यकी सावरकर - Satyaki Savarkar files defamation claim

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेले वक्तव्य हे कपोकल्पित असून, पूर्वीसुद्धा त्यांनी सावरकरांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे आमच्या कुटुंबीयांच्या आणि समर्थकांच्या भावना दुखावल्या आहेत. राहुल गांधी सांगतात ते खोटे सांगतात, कल्पना करून सांगतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतु सात्यकी सावरकर यांनी म्हटले आहे.

Satyaki Savarkar Defamation Suit
सात्यकी सावरकर विरुद्ध राहुल गांधी
author img

By

Published : Apr 13, 2023, 5:17 PM IST

सात्यकी सावरकर त्यांची पीडा मांडताना

पुणे: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयामध्ये मानहानीचा दावा ठोकण्यात आलेला असून सावरकर कुटुंबाच्या वतीने न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. एक महिन्यानंतर ही याचिका दाखल केल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु तो व्हिडिओ आमच्यापर्यंत आला नव्हता. अगोदर पुरावे गोळा केले आणि मी माझ्या वकिलांना भेट घेतल्यानंतर आम्ही दावा दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला त्या पुस्तकाचा पुरावा द्यायची जबाबदारी ही राहुल गांधीची आहे. सावरकरांचा अपमान करून, सावरकरांविषयी बोलून राजकीय फायदा घेणे, हा एकमेव उद्देश त्यांचा असल्याची टीकासुद्धा सात्यकी सावरकर यांनी केलेली आहे.

न्यायालय राहुल गांधी यांना समन्स बजावेल: राहुल गांधी यांनी यापूर्वीसुद्धा सावरकरांविषयी भरपूर वक्तव्य, टीका-टीपणी केली आहे. परंतु लोकशाहीत स्वातंत्र्य असले तरी, एखाद्या देशभक्ताच्या विरुद्ध किंवा स्वातंत्र्यवीराच्या ज्याला ब्रिटिश लोक घाबरायचे त्यांच्याविषयी अशा प्रकारे लोकांमध्ये संदेश देणे हे चुकीचे आहे. हे थांबले पाहिजे. कुटुंब म्हणून आम्हालासुद्धा याचा त्रास होतो. म्हणून आम्ही न्यायालयात आता दाद मागितलेली आहे. न्यायालय राहुल गांधी यांना समन्स बजावेल, असेसुद्धा सात्यकी सावरकर यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींचा अभ्यास कमी: राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचा अभ्यास कमी आहे. कदाचित त्यांचे वाचन कमी आहे. त्यामुळे ते असे करत असतील किंवा जाणून-बुजून त्यांना कोणी तसा सल्ला देत आहे का? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे; परंतु माझ्या पाठीमागे कुठलेही भाजप, हिंदू संघटन नाही. मी हे माझ्या कुटुंबासाठी करत आहे. मला याचा राजकीय फायदाही घ्यायचा नाही; पण सावरकरांचा अपमान थांबला पाहिजे, अशी आमच्या कुटुंबाची भावना असल्याने आम्ही हा निर्णय घेतल्याचे सात्यकी सावरकर म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा पुरावा देण्याची आता त्यांची जबाबदारी आहे. आम्ही आमच्या वतीने पुरावे गोळा केले. ते कोर्टामध्ये दाखल केले. पुढील कारवाई न्यायालय करेल, अशी माहितीसुद्धा सात्यकी सावरकर यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा: Asad Ahmed Encounter: एन्काउंटर झालेल्या असद अहमदचे वकील बनायचे होते स्वप्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.