ETV Bharat / state

Sassoon Hospital Pune : 'ससून'ची व्यवस्था व्हेंटिलेटरवर? 'ईटीव्ही भारत'चा Reality चेक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 7:47 PM IST

Updated : Oct 8, 2023, 8:31 PM IST

Sasoon Hospital Pune : विविध जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात मृत्यूंचं प्रमाण वाढलंय. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरनंतर नागपूरच्या रुग्णालयातून रुग्णांच्या मृत्यूचं प्रकरण (Nagpur Medical And Mayo Death Case) समोर आलं होतं. या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली जात आहे. अशातच राज्यभरातील विविध शहरांमधील शासकीय रुग्णालयातील औषधे तसेच रुग्णांची काय परिस्थिती आहे याबाबत माहिती घेतली जात आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाचा 'ईटीव्ही भारत'नं आढावा घेतलाय.

Sassoon Hospital Pune
ससून रुग्णालय

माहिती देताना अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर

पुणे : Sassoon Hospital Pune : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरनंतर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात (Nagpur Medical And Mayo Death Case) देखील २३ जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ससून रुग्णालयातील स्थितीची माहिती घेतली आहे. येथे 1200 ते 1300 रुग्ण हे ऍडमिट असून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तर ससून रुग्णालयाचा मृत्युदर हा एक टक्का असून, दिवसभरात विविध कारणाने जवळपास 10 रुग्णांचे मृत्यू (10 Patient Died) होत आहेत.

तीन महिन्यांचा औषधांचा साठा उपलब्ध : याबाबत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (Sanjiv Thakur) म्हणाले की, सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत की, रुग्णालयात तीन महिन्यांचा औषध साठा असणे गरजेचं आहे. त्या सूचनेनुसार रुग्णालयात तीन महिन्यांचा औषधांचा साठा हा ठेवण्यात आला आहे. तसेच रुग्णाला चांगल्या दर्जाचे औषधे वेळेवर मिळावे आणि रुग्णाने हे औषधे बाहेरून अणू नये याची काळजी घेतली जात आहे. तसेच ससून रुग्णालयात सध्या 1200 ते 1300 रुग्ण हे ऍडमिट (Sassoon Hospital Admit Patient) असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. यातील 50 टक्के रुग्ण हे क्रिटिकल आहेत.

'आयसीयू'मध्ये केले जातात उपचार : ससून रुग्णालयात दररोज जवळपास राज्यभरातून 1800 ते 2000 रुग्ण हे 'ओपीडी'मध्ये येत असतात. तर इमर्जन्सीमध्ये जवळपास 300 ते 400 रुग्ण हे येत असतात, यातील 250 ते 300 रुग्ण हे ऍडमिट होतात. महत्त्वाची बाब म्हणजे, ससून रुग्णालयातील तिन्ही इमारतींमध्ये 'आयसीयू' असून हे आयसीयू फूल असतात. ससून रुग्णालयात येणारे रुग्ण हे क्रिटिकल असून, त्यांच्यावर 'आयसीयू'मध्ये उपचार केले जातात, अशी माहिती यावेळी डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.

हेही वाचा -

  1. Doctor Day Special: डॉक्टर डे...ससून रुग्णालयाचे डीन स्वतः करतात शस्त्रक्रिया...पहा काय म्हणाले डॉ. संजीव ठाकूर
  2. Sassoon Hospital Pune: तृतीयपंथीयांसाठी उपचार घेणं झालं सोयीचं! आता 'ससून'मध्ये स्वतंत्र वॉर्ड
  3. Pune Crime News : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 2 कोटीचे अमली पदार्थ जप्त; पोलिसांचा तपास सुरू

Last Updated : Oct 8, 2023, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.