ETV Bharat / state

धर्मेंद्र, हेमा मालिनींच्या विरोधात संजय काकडेंची न्यायालयात धाव, 185 एकर जमिनीचा वाद - खासदार संजय काकडे

85 एकर जागेवर संजय काकडे हे बंगले बांधून त्याची विक्री करणार असून त्यातील नफ्याचे उत्पन्न दोघे मिळून निम्मे-निम्मे वाटून घेणार, असे निश्चित झाले होते. हा व्यवहार दोघांमध्ये ठरल्यानंतर काकडे यांनी डिपॉझीट रक्कम धर्मेंद्र कुटुंबीयास दिली.

Dharmendra
धर्मेंद्र
author img

By

Published : Jan 1, 2020, 9:41 AM IST

पुणे - अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेता खासदार सनी देओल, अभिनेता बॉबी देओल, अभिनेत्री ईषा देओल, उषा अजितसिंग देओल, अहाना देओल, प्रकाश देओल, विजयसिंग देओल, अजितसिंग देओल यांच्यासह एकूण नऊ जणांविरोधात राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुणे न्यायालयात धाव घेतली आहे. लोणावळा येथील 185 एकर जागेच्या संर्दभात धर्मेंद्र यांचे कुटुंबीय आणि काकडे यांच्यात व्यवहार झाला होता.

संजय काकडे, राज्यसभा खासदार

दोघे मिळून सदर जागेवर जे. डब्ल्यू. मेरियट रिसोर्ट व बंगल्याची स्कीम करणार होते. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांना पैसे देऊनही जमिनीची नोंदणी करण्यास ते टाळाटाळ करत असल्याचा आरोप खासदार काकडे यांनी केला आहे.

यावेळी काकडे म्हणाले, लोणावळामधील पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाजवळील जागेबाबत 31 मे 2018 रोजी खासदार संजय काकडे आणि अभिनेता धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या कुटुंबीयासोबत जागेचा व्यवहार निश्चित झाला. सदर ठिकाणी धर्मेंद्र यांचे कुटुंबीयाच्या मालकीची एकूण 215 एकर जागा आहे. त्यापैकी 25 एकर जागेत धर्मेंद्र यांचा बंगला आणि आजू-बाजूचा परिसर आहे. उर्वरित 185 एकर जागेपैकी 100 एकर जागेवर जे.डब्ल्यू मेरियट हे अलिशान पंचतारांकित रिसोर्ट उभारले जाण्याचे नियोजीत आहे. याकरिता काकडे आणि धर्मेंद्र यांचे कुटुंबीय निम्मा-निम्मा खर्च करण्याचे ठरले आहे. त्यापैकी 30 टक्के उत्पन्न धर्मेंद्र कुटुंबीय तर 70 टक्के उत्पन्न काकडे घेणार असे ठरविण्यात आले.

हेही वाचा - 'आमदार थोपटेंसाठी भाजपची दारे उघडी'

तर, 85 एकर जागेवर संजय काकडे हे बंगल्यांची स्कीम बांधून त्याची विक्री करणार असून त्यातील नफ्याचे उत्पन्न दोघे मिळून निम्मे-निम्मे वाटून घेणार, असे निश्चित झाले होते. सदर व्यवहार दोघांमध्ये ठरल्यानंतर काकडे यांनी डिपॉझीट रक्कम धर्मेंद्र कुटुंबीयास दिली. त्यानंतर तातडीने जमिनीची नोंदणी करून कामाला सुरुवात करणे, अपेक्षित होते. मात्र, धर्मेंद्र व त्यांच्या मुलांनी चित्रपटाचे काम होऊ दे, निवडणूक होऊ दे, असे सांगत 18 महिने होऊनही नोंदणी करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे काकडे यांनी याबाबत धर्मेंद्र यांच्याकडे तसेच त्यांच्या वकिलासोबत 20 वेळा बैठका घेऊनही पुढे काम जात नव्हते.

हेही वाचा - कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवारांनी दिली मानवंदना

काकडे यांनी सांगितले की, माझ्याकडून व्यवहार ठरल्यानंतर पैसे घेऊनही पूर्ण जागा देण्यास नकार देत 85 एकर जागा घ्या, आम्ही हॉटेलचे काम पाहतो, असे सांगत टाळाटाळ केली गेली. माझ्यावर काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला गेला. परंतु, सदर व्यवहाराची कागदपत्रे पाहिल्यानंतर वरिष्ठ राजकीय नेत्यांनी माझी बाजू योग्य असल्याचे सांगितले. धर्मेंद्र कुटुंबीयांना दुसरी एखादी मोठी पार्टी व्यवहाराकरिता मिळाली असावी, त्यामुळे माझ्यासोबत व्यवहार करण्यास ते चलबिचल करत आहेत, असे काकडे यांनी सांगितले.

याप्रकरणाची पुढील सुनावणी आर. व्ही. रोटे न्यायालयात 10 जानेवारीला होणार असून संबंधित प्रकरणात धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांना हजर राहण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

Intro:धर्मेंद्र, हेमामालिनी विराेधात संजय काकडे यांची न्यायालयात धाव

लाेणावळयातील 185 एकर जमीनी बाबतचा वाद चव्हाटयावर

अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री हेमामालिनी, अभिनेता खासदार सनी देवाेल, अभिनेता बाॅबी देवाेल,अभिनेत्री र्इषा देवाेल, उषा अजितसिंग देवाेल, अहाना धर्मंद्र देवाेल,प्रकाश देवाेल,विजयसिंग देवाेल, अजितसिंग देवाेल यांच्यासह एकूण नऊ जणां विराेधात राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुणे न्यायालयात धाव घेतली अाहे. लाेणावळा येथील 185 एकर जागेच्या संर्दभात धर्मेंद्र यांचे कुटुंबीय अाणि काकडे यांच्यात व्यवहार झाला हाेता, त्याप्रमाणे दाेघे मिळून सदर जागेवर जे.डब्ल्यू.मेरियट रिसाेर्ट व बंगल्याची स्कीम करणार हाेते. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे धर्मेंद्र यांचे कुटुंबियांना पैसे देऊनही जमीनीचे रजिस्ट्रेशन करण्यास ते टाळाटाळ करत असल्याचा अाराेप खासदार काकडे यांनी पत्रकार परिषदेत केला अाहे.

Body:काकडे म्हणाले, लाेणावळा मधील पुणे-मुंबर्इ द्रुतगती महामार्गा जवळील जागेबाबत 31 मे 2018 राेजी खासदार संजय काकडे अाणि अभिनेता धर्मेंद्र व अभिनेत्री हेमामालिनी यांचे कुटुंबीयासाेबत जागेचा व्यवहार निश्चित झाला. सदर ठिकाणी धर्मेंद्र यांचे कुटुंबीयाचे मालकीची एकूण 215 एकर जागा अाहे. त्यापैकी 25 एकर जागेत धर्मेंद्र यांचा बंगला अाणि अाजूबाजूचा परिसर अाहे. उर्वरित 185 एकर जागेपैकी 100 एकर जागेवर जे.डब्ल्यू मेरियट हे अलिशान पंचतारांकित रिसाेर्ट उभारले जाण्याचे नियाेजीत अाहे. याकरिता काकडे अाणि धर्मांद्र यांचे कुटुंबीय निम्मा-निम्मा खर्च करण्याचे ठरलेले अाहे.त्यापैकी 30 टक्के उत्पन्न धर्मेंद्र कुटुंबीय तर 70 टक्के उत्पन्न काकडे घेणार असे ठरविण्यात अाले. तर, 85 एकर जागेवर संजय काकडे हे बंगल्यांची स्कीम बांधून त्याची विक्री करणार असून त्यातील नफ्याचे उत्पन्न दाेघे मिळून निम्मे-निम्मे वाटून घेणार असे निश्चित झाले. Conclusion:सदर व्यवहार दाेघांमध्ये ठरल्यानंतर काकडे यांनी डिपाॅझीट रक्कम धर्मेंद्र कुटुंबीयास दिली व त्यानंतर तातडीने जमीनीचे रजिस्ट्रेशन करुन कामाला सुरुवात करणे अपेक्षित हाेते. मात्र, धर्मेंद्र व त्यांचे मुलांनी चित्रपटाचे काम हाेऊ दे, निवडणुक हाेऊ दे असे सांगत 18 महिने हाेऊनही रजिस्ट्रेशन करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे काकडे यांनी याबाबत धर्मेंद्र यांच्याकडे तसेच त्यांचे वकीला साेबत 20 वेळा बैठका घेऊनही पुढे काम जात नव्हते. काकडे यांनी सांगितले की, माझ्याकडून व्यवहार ठरल्यानंतर पैसे घेऊन ही पूर्ण जागा देण्यास नकार देत 85 एकर जागा घ्या अाम्ही हाॅटेलचे काम पाहताे असे सांगत टाळाटाळ केली गेली. माझ्यावर काही राजकीय नेत्यांचे माध्यमातून दबाव टाकण्याचा ही प्रयत्न केला गेला, परंतु सदर व्यवहाराची कागदपत्रे पाहिल्यानंतर वरिष्ठ राजकीय नेत्यांनी ही माझी बाजू याेग्य असल्याचे सांगितले. धर्मेंद्र कुटुंबियांना दुसरी एखादी माेठी पार्टी व्यवहाराकरिता मिळाली असावी त्यामुळे माझ्यासाेबत व्यवहार करण्यास ते चलबिचल करत अाहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी अार.व्ही.राेटे न्यायालयात 10 जानेवारी राेजी हाेणार असून संबंधित केसला धर्मेंद्र यांचे कुटुंबीयांना हजर राहण्यास न्यायाालयाने सांगितले अाहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.