पुणे - कोथरूडमधून आमदारकी लढलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पक्षाने दिल्लीहून लादलेले उमेदवार होते, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केले आहे.
पुणे शहराच्या महापौर पदासाठी भाजपने नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. भाजपमध्ये महापौर पदासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळाल्याने उमेदवारीचे समर्थन करताना भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात ऐनवेळी दिल्लीहून पक्षाने उमेदवार लादल्याने कोथरूडमध्ये इच्छुक असलेले मोहोळ नाराज होते, असे खळबळजनक विधान केले आहे. आता महापौरपद देऊन पक्षाने त्यांची नाराजी दूर केली आहे, असे देखील काकडे म्हणाले.
हेही वाचा - राज्यपालांच्या भूमिकेविषयी संभ्रम - राजू शेट्टी
मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय काकडे बोलत होते. राज्यात कुठल्याही परिस्थितीत पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असा दावा देखील काकडे यांनी यावेळी केला. राज्यात 2 प्रादेशिक पक्ष एकत्र येणे शक्य नाही. या 3 पक्षाच्या आघाडीत खोडा पडणारच आणि 8 दिवसात चित्र स्पष्ट होऊन भाजपचे सरकार येईल. देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा देखील काकडे यांनी केला.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का? वाचा काय म्हणाले जयंत पाटील...