ETV Bharat / state

Pune Crime : महिलेशी मैत्री करून लाखोंची फसवणूक करणाऱ्या रॉबिनहूडला दिल्लीत अटक - Robin Hood who cheated millions

महिलेशी मैत्री करून लाखोंची फसवणूक करणाऱ्या रॉबिनहूडला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रॉबिनहूड ओकोह (वय ३९, रा. दिल्ली) असे असून याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. फेसबुकद्वारे महिलांशी मैत्री करुन त्यांने महिलेची लाखोंची फसवणूक केली होती.

Pune Crime
Pune Crime
author img

By

Published : Apr 26, 2023, 10:10 PM IST

पुणे : सध्या गेल्या वर्षावर नजर टाकली तर सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असून गुन्ह्यांचे प्रकार बदललेत. सोशल मीडियाचा वापर करून फसवणूक सहज आणि सोप्या पद्धतीने केली जात आहे. अशीच एक सायबर क्राईमची घटना पुण्यात घडली आहे. फेसबुकच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करून त्यांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. महिलेला गिफ्ट पार्सल पाठवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या परदेशी टोळीतील नायजेरियनला सायबर पोलिसांनी दिल्लीत बेड्या ठोकल्या आहेत.

७ डेबिट कार्डसह इतर साहित्य जप्त : अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रॉबिनहूड ओकोह (वय ३९, रा. दिल्ली) असे असून याला सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. हा आरोपी मुळचा नायजेरियाचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून ४ मोबाईल, १ हार्डडिस्क, २ पेनड्राईव्ह, १५ सीमकार्ड, ७ डेबिड कार्डसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याला न्यायालात हजर केले असता 28 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे परदेशी टोळीतील सायबर चोरटे फेसबुकद्वारे विविध महिलांना फ्रेन्डरिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री करण्याच्या प्रकणामध्ये वाढ झाली आहे. मैत्री करतांना आरोपी अमेरिका, लंडन इत्यादी देशातील असल्याचे भासवून स्वत: डॉक्टर किंवा पायलट असल्याची बतावणी करतात. मग त्या महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर काही दिवसांनी ते मौल्यवान पार्सल (दागिने, पैसे ईत्यादी) पाठवित असल्याचे सांगतात. त्यांनतर हजारो रुपयांची फसवणूक करतात.

पार्सल पाठवल्याची बतावणी : या सायबर चोरांची चोरांनी महिलेला एक मौल्यवान पार्सल पाठवले असल्याची बतावणी केली होती. काही दिवसांनी त्यांनी संबधित महिलेला विविध मोबाईलवरून संपर्क साधत सीमाशुल्क विभाग, दिल्ली येथून बोलत असल्याचे भासवले. महिलेला पार्सल सोडण्याचे आमिष दाखवत विविध बॅंक खात्यात त्यांनी पैसे पाठवण्यास सांगितले. महिलेनेही भीतीपोटी पार्सल क्लिअरन्स, जीएसटी, आयएमएफ, मनी लाँडरिंग प्रमाणपत्रासाठी त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले.

आरोपीला दिल्लीतून अटक : अशीच फसवणूक पुण्यातील हडपसरमधील एका महिलेची केली होती. त्या महिलेकडून तब्बल 11 लाख 40 हजार 900 रुपयांची या चोरट्यांनी फसवणूक केली होती. जेव्हा या महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा या गुन्ह्यातील आरोपींनी वापरलेले इन्स्टाग्राम आयडी, व्हॉटसॲप क्रमांक तसेच वापरण्यात आलेले बँक खाती याची सर्व माहिती प्राप्त करुन तांत्रिक तपास केल्यावर आरोपी हा दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांचे पथक दिल्ली येथे जाऊन रॉबिनहुड ओकोह याला ताब्यात घेतले.

हेही वाचा - Political Crisis In Maharashtra : सत्तासंघर्षावर अमित शहा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नागपुरात, मोठे राजकीय संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.