ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड परिसरात चोरट्यांचा धूमाकूळ, ११ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास - चोरट्यांचा धुमाकूळ

हिंजवडी, भोसरी आणि चिखली परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. चोरट्यांकडून मोबाईल शॉपी, गारमेंन्टस, गिफ्ट शॉपी, पुणेरी बेकर्स यांना टार्गेट. तब्बल ११ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास.

चोरी प्रकरणी हिंजवडी, भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
author img

By

Published : Jul 6, 2019, 5:24 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड येथील हिंजवडी, भोसरी आणि चिखली परिसरात चोरट्यांनी दुकाने फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांत तब्बल ११ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. चोरट्यांकडून मोबाईल दुकाने, गारमेन्टस, गिफ्ट शॉपी, पुणेरी बेकर्स या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. या प्रकरणी हिंजवडी, भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरी प्रकरणी हिंजवडी, भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलीतील कुदळवाडी येथील मोबाईल शॉपी दुकानातून ५४ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन, मेमरी कार्ड, पावर बँक व पाच हजार रुपये तर हिंजवडीतील शिवाजी चौक येथील 'द हिमालया' मोबाईल शॉपी दुकानातील ८ लाख ६९ हजार रुपयांचे वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि ९० हजार रुपयांची रोकड लंपास केली. तिसऱ्या घटनेत इंद्रायणीनगर येथील लेमन गारमेन्टस, दादासाहेब भाऊराव फुके यांचे पुणेरी बेकर्स आणि सुरेशकुमार मांगेलालजी चौधरी यांचे गिफ्ट शॉपीचे दुकान चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री फोडले. या तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल ११ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान या घटनेनंतर व्यापाऱ्यांकडून पोलीसांची गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Intro:mh pun 03 robbery incident av 10002Body:mh pun 03 robbery incident av 10002

Anchor:- हिंजवडी, भोसरी आणि चिखली येथे अज्ञात चोरट्यानी दुकाने फोडल्याची घटना घडली असून यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या चोरीत तब्बल ११ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे. या घटने प्रकरणी हिंजवडी, भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल शॉपी, गारमेंन्टस, गिफ्ट शॉप, पुणेरी बेकर्सचे दुकाने चोरट्याने फोडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चिखली कुदळवाडी येथील मेनरोडवरील 'छाया मोबाईल शॉपी'च्या छताचा पत्रा उचकटून चोरटे आतमध्ये घुसले. दुकानातील ५४ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन, मेमरी कार्ड, पावर बँक आणि पाच हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला आहे. तर दुसऱ्या घटनेत हिंजवडीतील शिवाजी चौकात 'द हिमालया' या नावाने मोबाईल शॉपी आहे. गुरुवारी मध्यरात्री चोरटे दुकानाचा मागचा पत्रा व प्लाउड उचकटून आतमध्ये घुसले. दुकानातील ८ लाख ६९ हजार रुपयांचे वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि ९० हजार रुपयांची रोकड लंपास केली यर तिसऱ्या घटनेत इंद्रायणीनगर येथील लेमन गारमेन्टसचे, दादासाहेब भाऊराव फुके यांचे पुणेरी बेकर्स आणि सुरेशकुमार मांगेलालजी चौधरी यांचे 'गिफ्ट' चे दुकान चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री फोडले. या तिन्ही घटनेत चोरट्यानी तब्बल ११ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांकडून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.