पुणे - शिरुर तालुक्यात चोरीच्या घटना वाढत चालल्या असताना आज (सोमवारी) पहाटेच्या सुमारास पाबळ येथे ग्रामपंचायत बिल्डिंग मधील व्यापार संकुल मधील सात दुकानांवर चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा -एचसीएलचे चेअरमन शिव नाडर दिसणार संघाच्या मंचावर
शिरुर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून गावांगावांत चोरीच्या घटना वाढत आहेत. गावातील व्यापारी संकुल असणारी दुकाने लक्ष केली जात आहे. यामध्ये सात दुकानांचे शटर उचकटुन चोरी केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मात्र, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - 'राहुल गांधी आपला पक्ष चालवू शकत नाहीत, देश काय चालवणार?'
तर सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असताना शिरुर तालुक्यात चोरी सत्र रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांसमोर मोठे आवाहन असणार आहे.