ETV Bharat / state

DRDO Honey Trap: पाकिस्तानला क्षेपणास्त्रासंह इतर गोपनीय माहिती का दिली? कुरुलकर यांच्याविरोधातील आरोपपत्रात धक्कादायक माहिती - प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप केस

डीआरडीओचे शास्त्रज्ञ व संचालक प्रदीप कुरुलकर कुरुलकर पाकच्या महिला गुप्तहेर एजंटकडे आकर्षित झाले होते. त्यामुळे त्यांनी भारतीय क्षेपणास्त्र प्रणालींबद्दल महिलेची व्हॉट्सअपवर चर्चा केल्याचे एटीएसने आरोपपत्रात म्हटले आहे. डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅपमधून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने अडकविले होते. त्यासाठी पाकिस्तानी एजंट महिला झारा दासगुप्ताने कुरुलकर यांच्याबरोबरर संपर्कात होती.

DRDO Honey Trap ATS ATS chargesheet
प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप
author img

By

Published : Jul 8, 2023, 10:46 AM IST

Updated : Jul 8, 2023, 11:54 AM IST

पुणे- डीआरडीओचे शास्त्रज्ञ व संचालक प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी महिला एजंटबरोबर भारतीय क्षेपणास्त्रांबद्दलची चर्चा केली. तसेच इतर वर्गीकृत संरक्षण प्रकल्पांमधील प्रणालीबाबत दोघांमध्ये संभाषण झाल्याचे एटीएसच्या आरोपपत्रात म्हटले आहे.

कुरुलकर आणि झारा दासगुप्ता या महिला एजंटबरोबर व्हॉट्सअॅप व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकांशी संपर्कात होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. दासगुप्ताने ब्रिटनमधील सॉफ्टवेअर अभियंता असल्याचा दावा करत कुरुलकर यांना अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठविले. त्यामधून दोघांमध्ये मैत्री झाली आहे. तपासादरम्यान, तिचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानचा असल्याचे निष्पन्न झाल्याचे एटीएसने आरोपपत्रात म्हटले आहे.

देशद्रोही कृत्यावर शिक्कामोर्तब - अटकेनंतर जवळपास पंधरा दिवसापासून येरवडा कारागृहात असलेला कुरुलकर तपास यंत्रणेला तपासात मदत करत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले होते. अटकेनंतर कुरुलकरने असे घडले नसल्याचा बनाव करीत तपास यंत्रणेची दिशाभूल केली. त्याने विकसित केलेल्या रॉकेट लॉन्चर व मिसाईलवर संशोधन करून ते लष्करी सेवेत दिले आहे. या सर्व संशोधनाची माहिती पाकिस्तानला पाठवली असल्याचे तपासात उघड झाले आहे. एटीएस विभागाच्या तपास अधिकारी सुजाता तानवडे यांनी दोनच दिवसापूर्वी कुरुलकर विरोधात दोषारोपपत्र दाखल करून कुरुलकरने केलेल्या देशद्रोही कृत्यावर शिक्कामोर्तब केले.

आरोपत्रात काय म्हटले -

  • गोपनीय व संवेदनशील माहिती अधिकार नसताना संग्रहित करून कुरुलकरने बेकायदेशीर कृत्य केले असल्याचे दोषारोप पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्क, मोबाईल व संगणकात भारताने विकसित केलेल्या रॉकेट लॉन्चर व मिसाईलचे पीपीटी प्रेझेंटेशनसह ते कसे वापरले जाणार आहे याची सचित्र माहिती होती. पाकिस्तान ललनेच्या मोहात अडकून स्वेदशी तंत्रज्ञानातून तयार केलेल्या ब्रह्मोस्त्र, अग्नी मिसाईलसह आकाश लॉन्चरची सर्व गुपिते व त्यांचे तंत्रज्ञान पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला डीआरडीओचा शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरने पाठविले.
  • डीआरडीओत विकसित केलेल्या कंपोझिट हल, ब्रह्मास्त्र लॉन्चर, ड्रोन, यु सीबी अग्नी मिसाईल लॉन्चर, मिलेट्री ब्रिजिंग सिस्टम आणि मिलिटरी इंजीनियरिंग इक्विपमेंट तयार करणे, डेव्हलप करणे डिझाईन करण्याचे काम व इतर सुरक्षा संबंधित गोपनीय संवेदनशील माहिती कुरुलकरने दिली.
  • कुरुलकर यांनी महिला एजंटला सरफेस टू एअर मिसाईल बाबत व त्याच्या वापराबाबत माहिती देऊन त्याचे टेस्टिंग व ट्रायल दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच ड्रोन बाबतची माहिती, त्याचे कॅपेसिटी बाबतची माहिती देखील दिल्याचे उघड झाले आहे. भारतीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन रोबोटिक उपकरण जे शास्त्रज्ञ बनवतात त्यांचे नावही पाकिस्तानी हस्तकास देण्यात आली असल्याचेही दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

डीआरडीओकडून सुरू होती अंतर्गत चौकशी- पाकिस्तानी एजंटने ब्रह्मोस लाँचर, ड्रोन, यूसीव्ही, अग्नी क्षेपणास्त्र लाँचर आणि मिलिटरी ब्रिजिंग सिस्टीम यासह इतर महत्त्वाची व संवेदनशील मिळविण्याचा प्रयत्न केला. महिला एजंटबाबत आकर्षित झाल्यानंतर कुरुलकर यांनी डीआरडीओची संवेदनशील माहिती वैयक्तिक फोनमध्ये स्टोअर केली. त्यानंतर ती झाराला पाठविल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. एटीएसच्या म्हणण्यानुसार हे दोघे जून 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत एकमेकांशी संपर्कात होते. डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय आढळल्यानंतर त्यांची अंतर्गत चौकशी सुरू केली.

दुसऱ्यांदा माहिती शेअर केली- घाबरलेल्या कुरुलकर यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये झाराचा नंबर ब्लॉक केला. त्यांना पुन्हा दुसऱ्या एका अनोळखी भारतीय नंबरवरून व्हॉट्सअॅप मेसेज आला. तुम्ही माझा नंबर का ब्लॉक केला? असे विचारणारे चॅट रेकॉर्डमध्ये असल्याचे आरोपपत्रात म्हटले. दुसऱ्यांदाही कुरुलकर यांनी त्यांची वैयक्तिक माहिती, अधिकृत कामाचे वेळापत्रक आणि लोकेशन शेअर केली. संरक्षण विभागाच्या नियमानुसार अशी माहिती कोणाशीही शेअर करायची नव्हती हे माहीत असूनही कुरुलकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे एटीएसने आरोपपत्रात म्हटले आहे.

गोपनीय माहिती उघड केल्याने अटक- महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कुरुलकर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. प्रदीप कुरुलकर हे २०१२ मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळेचे संचालक होते. संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती उघड केल्याने त्यांना ३ मे रोजी अटक करण्यात आली. ते आता न्यायालयीन कोठडीत आहेत. कुरुलकर हे हनी ट्रॅप अडकल्यानंतर अनोळखी व्यक्तींशी चॅट व कॉलिंग करू नका, असे आदेश डीआरडीओने दिले आहेत.

संरक्षण गुपीते धोक्यात- कुरुलकरने महिला एजंटला सरफेस टू एअर मिसाईल बाबत व त्याच्या वापराबाबत माहिती देऊन त्याचे टेस्टिंग व ट्रायल दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच ड्रोन बाबतची माहिती, त्याचे कॅपेसिटी बाबतची माहिती देखील दिल्याचे उघड झाले आहे. भारतीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन रोबोटिक उपकरण जे शास्त्रज्ञ बनवतात त्यांचे नावही पाकिस्तानी हस्तकास देण्यात आली असल्याचेही दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Last Updated : Jul 8, 2023, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.