गिरीश बापट यांनी केलेलं प्रतिनिधित्व: यावेळी कसबा पोटनिवडणुकीवर पवार म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीत सामान्य माणसांकडून आम्हाला ऐकायला मिळत होते की यश मिळेल. पण मला खात्री नव्हती त्याच कारण म्हणजे नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ हे होते. यांच्या खोलात जायची गरज नाही. कारण हा भाग भाजपचा गड आहे. असे अनेक वर्षापासून सांगितल जात आहे. याच दुसरे कारण म्हणजे या भागात आत्ताचे खासदार गिरीश बापट यांनी केलेलं प्रतिनिधित्व आहे. बापट यांचे वैशिष्ट्य असे की त्यांचे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांशी चांगले संबंध आहे. तसेच विविध पक्षातील नेते मंडळी यांच्याशी देखील त्यांचे मैत्रीचे संबंध आहे. साहजिकच आहे की त्यांचे ज्या ठिकाणी लक्ष केंद्रित आहे तो मतदार संघ हा आपल्याला जड जाईल अस एक अनुमान होता.पण शेवटी शेवटी त्यांच्या निर्णयाने हा निर्णय घेण्यात आले नाही अशी चर्चा सुरू झाली. याचा फायदा देखील होईल अशी चर्चा होती. पण निवडणुकी नंतर माहिती घेतली असता जो माणूस जिंकून आला आहे. तो त्या ठिकाणी वर्षानुवर्ष सामान्य जनतेचे काम हे कोणतीही अपेक्षा न ठेवता करत आहे. विशेष म्हणजे हा उमेदवार चार चाकी नव्हे तर, दुचाकी वरचा असल्याने याचा फायदा देखील झाला असल्याचे यावेळी पवार म्हणाले.
पत्रावर सर्वात पहिली सही माझी: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे कसबा पोट निवडणुकीचा विजय हा धंगेकर यांचा आहे. यावर पवार यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की उमदेवार अमाचा होता हे तरी फडणवीस मान्य करतील का महविकास आघाडी म्हणून सगळे काम करत होते. असे देखील यावेळी पवार म्हणाले. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ९ विरोधकांनी एकत्र येऊन जे पत्र लिहले आहे. त्यात सर्वात पहिली सही माझी आहे. केजरीवालच्या सरकारने काम केले ते पाहायला लोक दिल्लीत येत आहेत. दिल्ली दारू घोटाळ्याचे आरोप होत असतील तर त्याची चौकशी करा हवी तसेच राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन वस्तुस्थिती सांगितली त्यात चुकीचे काय आहे.
पाटील यांना टोला: यावेळी पवार यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच नाव घेऊन प्रश्न विचारले असता, शरद पवार म्हणाले की शहण्या माणसाबद्दल विचारावे अस म्हणत पाटील यांना टोला लगावला आहे. तसेच काल झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस चे लोक असतील तर आनंद आहे. कारण आज शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिघे एकच भूमिका मांडत आहेत आणि या तिन्ही पक्षांची ताकद कालच्या सभेत दिसली.