ETV Bharat / state

शेतकरी नव्हे तर शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकणारे देशद्रोही - राजू शेट्टी - शेतकरी आंदोलनाबद्दल बातमी

शेतकरी नव्हे तर शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकणारे देशद्रोही असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. ते शेतकरी आंदोलनातील एका प्रकरणासाठी इंदापूर न्यायालयात आले होते.

Raju Shetty criticized the central government
शेतकरी नव्हे तर शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकणारे देशद्रोही - राजू शेट्टी
author img

By

Published : Feb 9, 2021, 7:11 PM IST

Updated : Feb 9, 2021, 7:52 PM IST

बारामती (पुणे) - दिल्लीतील आंदोलन हे खलिस्तान वाद्यांचे, नक्षलवाद्यांचे आहे. या आंदोलनाला पाकिस्तान, चीनचा पाठिंबा आहे. असे म्हणत शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. सीमेवर जे जवान शहीद होतात, त्यातील ६० टक्के जवान हे शेतकर्‍यांच्या घरातील पोर आहेत. शेतकऱ्यांना देशद्रोही म्हंटल्यावर राग येणार नाही का? वेदना होणार नाहीत का, असा सवाल करून मागील ८० दिवस शेतकऱ्यांना थंडीत कुडकुडत बसायला भाग पाडले. देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांनी येऊ नये म्हणून त्यांच्या वाटेत खिळे ठोकले. तेच खरे देशद्रोही असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

शेतकरी नव्हे तर शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकणारे देशद्रोही - राजू शेट्टी

ऊसदरा संदर्भात २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखाना स्थळावर आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी आज इंदापूर न्यायालयात ते हजर झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नको असलेले कायदे शेतकऱ्यांवर लादले -

सदरचे आंदोलन हे देशभरातील ८० कोटी शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. मात्र, केंद्र सरकारकडून हे आंदोलन मूठभर शेतकऱ्यांचे व दलालांचे असल्याचे भासवले जात आहे. दिल्लीत सुरू असणाऱ्या आंदोलनात शेतकरी एकच मागणी करत आहेत की, शेतकऱ्यांचा शेतीमालाला हमीभाव मिळावा. यासाठी दिल्लीत शेतकरी एकवटला आहे. शेतमालाला हमी भाव मिळावा. असा सरकारने कायदा करावा. ही आमची मागणी आहे. मात्र, ज्याची आम्ही कधी मागणीच केली नाही. असे तीन कायदे शेतकऱ्यांवर लादले गेले आहेत. याला आमचा विरोध असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

उर्वरित वीज बिल भरण्याचे शेतकऱ्यांना आव्हान -

राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कृषीपंप वीज बिल पन्नास टक्के माफ केले आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. शेतकऱ्यांनी ही उर्वरित पन्नास टक्के बिल भरण्याचे आव्हान शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले. मात्र, लॉकडाऊन दरम्यानच्या तीन महिन्यांचे घरगुती वीज बिल आम्ही कदापिही भरणार नाही. असेही शेट्टी यांनी सांगितले.

सुधारणा गरजेच्या मात्र -

काळाच्या ओघात कायद्यात सुधारणा झाल्याच पाहिजेत, त्याला आमचा विरोध नाही. मात्र, तुम्ही व्यवस्थाच बदलू पाहत आहात. घरात ढेकणे झाली म्हणून कोणी घर जाळत नसते. मात्र, हे सरकार घर जाळायला निघाले आहे. याला आमचा विरोध आहे. पवारांची ही अशीच भूमिका आहे, असे शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Last Updated : Feb 9, 2021, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.