पुणे - पुण्यातून गेल्या तीन दिवसांपासून गायब असलेली मुलगी गोव्यातील मडगावच्या कोलवा गावात सापडली ( Kuchik Case lost girl found in Goa ) असल्याची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. गायब झालेल्या तरुणीने शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला ( Raghunath Kuchik Case ) होता.
चित्रा वाघ यांनी दिली माहिती -
चित्रा वाघ यांनी सांगितले, की काल रात्री त्या पीडित मुलीचा फोन मला आला होता. तीने मला असे सांगितले की मी पुण्याकडे येत असताना काही लोकांनी इंजेक्शन देऊन पुण्यातून बाहेर नेले आहे. यात पोलीस ही होते असे तिने सांगितले आहे. या साऱ्यांनी पीडितेला महाराष्ट्रातून बाहेर नेल्याची धक्कादायक माहिती त्या पिडीतेने मला सांगितली आहे, यासंदर्भात पुणे पोलिसांना सविस्तर कळवले असल्याचे भाजपा नेते चित्रा वाघ यांनी माहिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीत पीडितेने सांगितले होते, की लग्नाची आमिष दाखवून शिवसेना नेते कुचीक यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती पीडिता प्रेग्नेंट झाली होती. त्यानंतर आरोपीने बळजबरीने तरुणीचा गर्भपात केला. या साऱ्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितले तर जीवे मारीन अशी धमकी देखील दिली होती. असे तक्रारीत म्हटलेले आहे. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये रघुनाथ कुचीक यांच्याविरोधात कलम ३७६,३१३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील करत आहेत.
फेसबुक लाईव्ह करुन केला होता आत्महत्येचा प्रयत्न -
शनिवारी त्या पीडितेने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुणे पोलिसांच्या प्रसंगावधानाने त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. पण त्यानंतर ती मुलगी कुठेच सापडत नव्हते पण अखेर तीन दिवसांनी ते गोवा येथे असल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.
कुचीक यांच्या पुरुषर्थाची वैद्यकीय चाचणी -
शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांच्या पुरुषर्थाची वैद्यकीय चाचणी शिवाजीनगर पोलिसांनी आज केली आहे. त्यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे.