पुणे- कोरोना रुग्णांच्या बाबतीत शहराचा समावेश रेड झोनमध्ये आहे. आजघडीला पुण्यातील १ हजार ३०० हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील ६९ ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात हे ६९ परिसर वगळता इतर भागात जीवनावशक्य वस्तुंखेरीज इतरही दुकाने उघडण्यास पुणे महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील दुकाने उघडण्यात आली आहेत.
महापालिकेने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या काळात दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. शिवाय सर्व दुकानांना कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे, नव्याने उघडल्या जाणाऱ्या दुकानांमध्ये मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे.
हेही वाचा- लॉकडाऊन ३.० : पिंपरी-चिंचवडमधील 286 परप्रांतीय मजुरांची बसमधून घरवापसी