दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील नोकरदारवर्ग आणि विद्यार्थी पुण्याला ये-जा करत असतात. पीएमपीएल बस आता यवतपर्यंत येत आहे. ही बस चौफुलापर्यंत यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. सध्या रेल्वे सेवा बंद असल्याने प्रवाशांना चौफुलामार्गे पुण्याला जावे लागत आहे. खासगी वाहनांनी प्रवास करणे खूप खर्चिक आणि कसरतीचे होत आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्ग : शाॅर्ट सर्किटमुळे आग लागून कलम बागेचे मोठे नुकसान
खासगी वाहनांनी धोकादायक आणि खर्चिक प्रवास
खाजगी वाहनाने चौफुला ते पुणे प्रवास करताना सुमारे शंभर ते दोनशे रुपये मोजावे लागतात. त्याचबरोबर त्या वाहनांच्या भरतीवर वाहन निघण्याचे ठरते. प्रवाशांचा वेळ तर जातोच. त्यासोबत पैसेदेखील अधिक मोजावे लागतात व प्रवासात धोकादेखील उद्भवतो. पीएमपीएलची बस सेवा सुरू झाल्यावर अगदी वेळेवर नोकरीच्या ठिकाणी पोहोचता येईल, अशी प्रवाशांना आशा आहे.
चौफुलापर्यंत पीएमपीएलची बस सुरू केल्यास पुढील गावांना फायदा
पीएमपीएलची बस चौफुलापर्यंत सुरू केल्यास या सेवेचा फायदा दौंड तालुक्यातील वरवंड, केडगाव, बोरीपार्धी, नांनगाव, पारगाव, दापोडी, पारगाव, खोपोडी, चौफुला-धायगुडेवाडी, देऊळगाव, पडवी आदी गावांना होईल.
पुण्यात नोकरी करत असणारा वर्ग दत्तात्रय टेकवडे, सुशांत संकपाळ, दादा गावडे यांनी बस सेवेसाठी मागणी केली. अखंडित बस सेवा उपलब्ध झाल्यावर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले तर पर्यायी व्यवस्थादेखील भविष्याच्या दृष्टिकोनातून होईल असे मत दत्तात्रय टेकवडे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - परभणी : 4 बळी घेतलेल्या 'त्या' अपघाताचे आरटीओकडून ऑडिट