पुणे : कोयता टोळीची दहशत कायम असतानाच पुण्यात एक नवीन गुन्ह्याची घटना उघडकीस आली आहे. व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या एकाला पोलिसांनी बेड्या ठेकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून 5 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. विश्वनाथ रतन गायकवाड (वय 38 ) रा. 469/9 कात्रज खोपडे नगर गुजरवाडी, पुणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
व्हेल माशाच्या उलट्यांची विक्री : पुण्यातील गुडलक कॅफेच्या मागील बाजूस व्हेल माशाच्या उलट्यांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याकडून पाच कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. त्यामुळं या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रोडवरील गुडलक हॉटेलच्या मागे एक व्यक्ती व्हेल माशाची उलटी विकत असल्याची माहिती पोलिस नाईक सचिन गायकवाड यांना मिळाली.
तब्बल पाच कोटींची उलटी : त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांना ही माहिती देण्यात आली. यावेळी तत्काळ उपनिरीक्षक महेश भोसले संबंधित ठिकाणी धाव घेतली. यावेळी संशयित आरोपीला इथं काय करत आहे? असा प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर देता आले नाही. त्यानं उडवा उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळं पोलिसांनी त्यांच्या बॅगची झडती घेतली. त्यावेळी त्याच्यात पाच कोटी किमतीची व्हेल माशाची उलटी सापडली. ही कारवाई पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत, अमलदार बोरसे, धनश्री सुपेकर, अमलदार रोहित पथरूट, महेश काळे, धनाजी माळी, दशरथ गभाले यांच्या पथकानं केली.
- व्हेलच्या उलटीची तस्करी का : व्हेल मासा खोल समुद्रात राहतो. या माशाच्या कोणत्याही भागाचा व्यावसायिक वापर करणा हा कायद्यानं गुन्हा आहे. व्हेल मासा शारीरिक प्रक्रियेतून उलट्या करतो. याच उलटीला अंबर ग्रीस म्हणतात. व्हेल माशाची उलटी पाण्यात विरघळत नसल्यामुळं ती पाण्यावर तरंगू लागतो. या उलटीचा वापर औषध, परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हेही वाचा -