पुणे : शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यात अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली आहे. या दोघांची हत्या केल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहे. गायकवाड यांनी हे पाऊल का उचलले या मागचे कारण काय याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
काय आहे कारण : मिळालेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड यांचे कुटुंब हे पुण्यातील बालेवाडी परिसरात राहत होते. भारत गायकवाड हे शनिवारी सुट्टीवर पुण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. भारत गायकवाड यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी आपली पत्नी मोनी गायकवाडच्या डोक्यात गोळी मारली. गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर एसीपी गायकवाड यांचा मुलगा आणि पुतण्या हे दोघे त्या खोलीत शिरले. दरवाजा उघडताच एसीपी गायकवाड यांनी पुतण्या दीपकवर गोळी झाडली. दीपकच्या छातीला गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गायकवाड यांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली, असे प्राथमिक अंदाजावरुन सांगितले जात आहे.
पहाटे साडेतीन वाजल्याच्या सुमारास अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी त्यांच्या पत्नी मोनी गायकवाड यांच्यावर स्वतः हा फायरिंग केली. त्यांना अडवण्यासाठी त्यांचा मुलगा आणि पुतण्यामध्ये गेल्यावर एक गोळी पुतण्याला लागली आणि त्याचा देखील मृत्यू झाला आहे. त्यानंतर गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. - बालाजी पांढरे, चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पोलीस अधिकाऱ्याने केला पत्नीच्या आत्महत्येचा बनाव : काही महिन्यापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली होता. ही घटना धाराशिवमध्ये घडली होती. येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आपल्या पत्नीचा खून केला होता. या अधिकाऱ्याने पत्नीने आत्महत्या केली असल्याची बतावणी केली होती. विनोद चव्हाण, असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पत्नीच्या खून प्रकरणात विनोद चव्हाण यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विनोद चव्हाण यांनी पत्नी मोनालीची गोळ्या घालून हत्या केली होती.
हेही वाचा -