पुणे : संरक्षण संशोधन संस्था (DRDO), पुणेचे संचालक प्रदीप कुरुळकर यांना 3 मे रोजी एटीएसने अटक केली होती. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, व्हॉईस मेसेज, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून भारताच्या शत्रू देशांशी संर्पकात असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कुरुळकर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी (पीआयओ) संपर्कात होते. त्यांनी सरकारी पदाचा गैरवापर करून संवेदनशील सरकारी माहिती बेकायदेशीरपणे पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे.
अनेक परदेश दौरे : प्रदीप कुरुळकर यांनी वर्षभरात अनेक वेळा परदेश दौरे केले आहेत. या काळात ते पाकिस्तानी हेरांनाही भेटल्याचा संशय आहे. जर त्यांनी कोणती कार्यालयीन गोपनीय माहिती शेअर केली? असेल तर देशासाठी ती माहिती घातक ठरु शकते असे तज्ञांचे मत आहे. त्यासाठी त्यांनी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरले आहे का, याचाही तपास सुरू आहे.
कुरुलकरच्या हालचाली संशयास्पद : डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुळकर यांचे नाव मोठे, ते हनी ट्रॅपमध्ये कसे अडकले याची माहिती घेतली जात आहे. फसवणूक झाल्यानंतर त्यांनी काही माहिती दिली का? असाही तपास अधिकारी करीत आहेत. याची चौकशी सायबर तज्ज्ञांकडूनही आहे. गुप्तचर यंत्रणांना जानेवारीमध्ये याची माहिती मिळाली होती. प्रदीप कुरुलकरच्या हालचाली संशयास्पद आढळल्यावर त्यांचा लॅपटॉप, मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
कुरुळकर यांच्या कोठडीत 15 मे पर्यंत वाढ : त्यानंतर डीआरडीओच्या समितीकडे तपास सोपवण्यात आला. तपासात कुरुळकर दोषी आढळल्यानंतर त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन एटीएसएने जप्त केला आहे. आता तपासात अनेक गोष्टी समोर येत आहेत. यावेळी शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर यांच्या पोलीस कोठडीत 15 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. जप्त केलेले मोबाईल लॅपटॉप फॉरेन्सिककडे सुपूर्द करण्यात आला आहे. आरोपीचे पासबुक / बँक स्टेटमेंट मिळवायचे आहे. त्यातील व्यवहार तपास करायचा आहे. तसेच शासकीय पासपोर्टच्या वापराबाबत तपास करायचा आहे. आणखी काही नावे निष्पन्न झाली आहेत, त्यांचा तपास करायचा आहे. तपासात समोर आलेले मेल आयडी पाकिस्तानातील असल्याचे समोर आले आहे. या कारणास्तव कुरुलकर यांच्या कोठडीत वाढ झाली आहे.