ETV Bharat / state

लॉकडाऊनचा फटका पीएमपीएमएलला; दरोरोज केवळ सव्वा लाखांचे उत्पन्न - पुणे कोरोना अपडेट्स

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाउनमुळे शाळा, कॉलेज, खासगी कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा मोठा फटका पीएमपीएलला बसला आहे.

लॉकडाऊनचा फटका पीएमपीएमएलला; दरोरोज केवळ सव्वा लाखांचे उत्पन्न

author img

By

Published : Apr 25, 2020, 4:20 PM IST

पुणे - दिवसाला सरासरी दहा लाख प्रवासी आणि दीड कोटी रुपये उत्पन्न मिळविणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला लॉकडाऊनच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या महिनाभरात प्रतिदिन केवळ सव्वा लाखांचे उत्पन्न पदरी पडले असून दिवसाकाठी केवळ दहा हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले आहे.

लॉकडाऊनचा फटका पीएमपीएमएलला; दरोरोज केवळ सव्वा लाखांचे उत्पन्न

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाउनमुळे शाळा, कॉलेज, खासगी कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा मोठा फटका पीएमपीएलला बसला आहे. २० मार्च ते २२ एप्रिल या कालावधीत सुमारे तीन लाख प्रवाशांनी पीएमपीने प्रवास केल्याचे नोंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून पीएमपीला 35 लाखांपर्यंतचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

लॉकडाऊनच्या या 32 दिवसात पीएमपीएमएलचा साधारणत: 40 कोटीच्या आसपास नुकसान झाले आहे. लॉकडाऊनच्या या काळात सव्वाशे बस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी चालू आहे. शहरातील 13 डेपोंमध्येही बस सुविधा चालू आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यात सध्या 2100 बसेस आहे. त्यातील फक्त सव्वाशे बस मार्गावर आहेत.

दर महिन्याला पीएमपीएमएलच्या सर्व कामगारांचा पगार हा 35 कोटीपर्यंत असतो. मात्र, याचा भरणा करण्यासाठी दोन्ही महापालिका वेळोवेळी मदत करतच आहेत. लॉकडाऊनच्या या काळातही पुणेकरांसाठी उत्तम सेवा देण्याचे काम आमच्या माध्यमातून सुरू आहे, अशी माहिती पीएमपीएलचे संचालक नगरसेवक शंकर पवार यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.