ETV Bharat / state

Kalubai Yatra : मांढरदेवी गडावरील काळूबाई यात्रेसाठी जोरदार तयारी ; मंदिराच्या डागडुजीचे काम सुरू - मांढरदेवी गड

6 जानेवारीला मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा (Kalubai Yatra Satara District ) आहे. कोरोनानंतर पहिल्यांदा निर्बंधमुक्त अशी यात्रा जानेवारीत होणार आहे. त्यासाठी गडावर जोरदार तयारी सुरू आहे.

Kalubai Yatra
काळूबाई यात्रेसाठी जोरदार तयारी
author img

By

Published : Dec 12, 2022, 12:31 PM IST

पुणे : सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा येत्या 6 जानेवारीला येणार असून त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. 2005 मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर या गडावरील यात्रा पूर्णपणे शासकीय नियमांनुसार पार पाडली जाते. यंदाची यात्रा ही कोरोनानंतर पहिल्यांदा होणार असून निर्बंधमुक्त अशी यात्रा जानेवारीत होणार आहे. त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून योग्य ती तयारी करण्यात येत असून मंदिराच्या बाजूला असलेल्या दुकाने मागे घेऊन रस्ता मोठे करण्यात येत आहे. तसेच मंदिराच्या आतमध्ये चांदीचे काम सुरू असून मंदिराबाहेर डागडुजीचे काम सुरू (preparation for Kalubai Yatra at Mandhardevi Fort) आहे.

निर्बंधमुक्त यात्रा : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्रीकाळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते, तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करणारे भाविक-भक्त वर्षभर येत असतात. यंदाची यात्रा निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेला येणार असून त्यासाठी योग्य ती तयारी करण्यात येत (preparation for Kalubai Yatra) आहे.

काळूबाई यात्रेसाठी जोरदार तयारी

यात्रोस्तवाचे मुख्य आकर्षण : देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली. म्हणून आजही पौष पोर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक देवीचे देव्हारे घेउन गडावर येतात. ढोल, झांज ही देवीची प्रमुख वाद्ये आहेत. भाविक गडावर चुली पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच सेवकांना मासांहारी नैवेद्य दाखवतात. पौष पोर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवुन हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो. देवीचा छबिना हा यात्रोस्तवाचे मुख्य आकर्षण (Kalubai Yatra at Mandhardevi Fort ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.