पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचा प्रकार समोर आला आहे. धरण परिसरात काही तरुण ड्रोनने शूट घेत होते, याचा थांग पत्ता संबंधित अधिकाऱ्यांना लागला नाही. नंतर अधिकारी त्या ठिकाणी जाऊन आले अशी सावरासावर संबंधित पाटबंधारे अधिकारी यांनी केली आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या सुरक्षाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाची सुरक्षा रामभरोसे मिळालेल्या माहितीनुसार, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे सौंदर्य टिपण्यासाठी धरणाच्या बंधाऱ्यावरून विना परवाना ड्रोन कॅमेरा फिरत होता. पर्यटकांची ड्रोनद्वारे शुटिंग चालु होती. त्या ठिकाणी धरणाचे कोणतेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. तसेच धरण परिसरात दोन किलोमीटर अंतरावर ड्रोन कॅमेऱ्याला कोणालाच परवानगी नसताना ड्रोन लावले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे. त्यांनी प्रथम पाणी विसर्ग बंद केला. काही कर्मचारी शुटिंग करणाऱ्यांना शोधण्यासाठी गेले. मात्र, तोपर्यंत ते पळून गेले असे म्हणून त्यांनी पळवाट शोधली. मात्र, यामुळे धरणाची सुरक्षा रामभरोसे आहे हे अधोरेखित होत असून धरण व क्षेत्र संवेदनशील परिसरात मोडले जाते. याबाबत धरण अधिकारी अशोक शेट्ये यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांत अज्ञात ड्रोन कॅमेरा चालविणाऱ्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा - सहा महिन्यांपासून भीमाशंकर लॉकडाऊन, पर्यटन बंद असल्याने व्यावसायिकांचे नुकसान