ETV Bharat / state

Ajit Pawar On Sikandar Sheikhs : पैलवान सिकंदर शेखच्या कुस्तीवरुन द्वेषाचे राजकारण - अजित पवार

author img

By

Published : Jan 21, 2023, 10:28 PM IST

Updated : Jan 21, 2023, 10:44 PM IST

महाराष्ट्र केसरी सेमीफायनलमध्ये झालेल्या पैलवान सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड यांच्या रंगतदार लढत बघायला मिळाली होती. मात्र, महेंद्र गायकवाड याला दिलेल्या चार गुणांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत टांग कोणी कोणाला मारली यावरून गेली काही दिवस चर्चेचा धुराळा उडाला. त्यात कधी अंगाला माती न लावलेले, कधी लंगोट न घातलेले, बिना लंगोटीचे पुढे होते, असा चिमटा पवार यांनी काढला आहे.

Ajit Pawar On Sikandar Sheikhs
पैलवान सिकंदर शेखच्या कुस्तीवरुन द्वेषाचे राजकारण - अजित पवार

अजित पवार यांची प्रतिक्रिया

पुणे - नुकतीच मागच्या आठवड्यात पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. या स्पर्धेत पुण्याच्या शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरी स्पर्धचा किताब पटकावला आहे. पण, सेमीफायनलमध्ये झालेल्या पैलवान सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड यांच्या लढतीत महेंद्र गायकवाडला दिलेल्या चार गुणांची चर्चा राज्यभर पाहायला मिळाली. यावर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील आपल मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत टांग कोणी कोणाला मारली यावरून गेली काही दिवस चर्चेचा धुराळा उडाला. त्यात कधी अंगाला माती न लावलेले, कधी लंगोट न घातलेले, बिना लंगोटीचे पुढे होते. हे खर तर वास्तव आहे. माझे म्हणणे आहे की जे खेळ करतात त्यांनी त्यात अधिकारवाणीने बोललं पाहिजे. आमच्यासारख्यांनी तोंडाची वाफ वाया घालू नये. अस यावेळी पवार म्हणाले.

हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरीचा सन्मान - महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते पुणे जिल्ह्याचे सुपुत्र असणाऱ्या हिंदकेसरी पै. अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोघांनाही २ नवीन बुलेट सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच उपमहाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड याचा देखील यावेळी सन्मान यावेळी करण्यात आले आहे.

खेळारा राजकीय रंग - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र तसेच उत्तर भारतातील मल्ल्यांना पराभवाचा पाणी पाजनारा सिकंदर शेख हा देखील लढवय्या मल्ल आहे. त्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देखील उत्तम कामगिरी केली आहे. माझी विनंती आहे की ,सिकंदरवरून काही जण समाजात विनाकारण द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. खेळाला जातीय स्वरूप देऊ नये. प्रत्येक मल्लाच धर्म हा कुस्ती असतो. त्यामुळे जाती पातीचा राजकारण करून खेळाला बदनाम करु नये असे देखील यावेळी पवार म्हणाले.

हिंदकेसरी, महाराष्ट्र किताब पुण्यात - केसरी खासदार शरदचंद्रजी पवार यांनी महाराष्ट्रातील कुस्ती जोपासण्यासाठी गेली अनेक वर्ष मोठे योगदान दिले आहे. पहिल्यांदाच एकाच वेळी हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी हे दोन्ही किताब पुणे जिल्ह्याच्या सुपुत्रांना मिळत असल्याने हा आमच्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे असे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Maharashtra Kesari Umpire Threat : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचाला जीवे मारण्याची धमकी, कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल

Last Updated : Jan 21, 2023, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.