ETV Bharat / state

जीम सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मनसेचे पत्र, तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा - पिंपरी चिंचवड मनसे बातमी

महाराष्ट्रातील सर्व जीम व्यवयास सुरू करण्याबाबत पिंपरी-चिंचवड मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडामंत्र्यांनी पत्र पाठवले आहे. जीम व्यवसायाबाबत लवकर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

file photo
file photo
author img

By

Published : Aug 10, 2020, 8:28 PM IST

पिंपरी चिंचवड (पुणे) - महाराष्ट्रातील सर्व जीम व्यवसाय सुरू करण्याबाबत पिंपरी-चिंचवड मनसेने आज (10 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह क्रीडामंत्री यांना पत्र पाठवले असून त्यावर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे गटनेते आणि नगसेवक सचिन चिखले यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॅाकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून महाराष्ट्रातील सर्व जीम व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. नियम व अटी घालत अनेक व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. जिम व्यवसायही चालू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे मनसेने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

साधारणपणे मगील पाच महिन्यांपासून जीम व्यवसाय संपूर्ण देशात बंद आहे. कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्रातील साधारणपणे 15 हजार जिम चालक, मालक, ट्रेनर, हाउसकीपिंग स्टाफ, योगा टीचर, झुंबा टीचर, डायटीशियन, मसाजिस्ट, न्यूट्रिशन दुकानाचे मालक व त्यांचे कर्मचारी, न्यूट्रिशन कंपनीचे कामगार, व्यायाम शाळा साहित्य बनवणारे कामगार, तसेच या व्यवसायाशी संबंधित असलेले कामगार हे गेल्या पाच महिन्यांपासून बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिम व्यवसायिकांना लाखो रुपयांची थकीत भाडे, कर्मचारी पगार, वीज बिल, मेंटेनन्स कसा भागवायचा याची चिंता लागली आहे. त्यांना आर्थिक पाठबळ देण्यात यावे अन्यथा जिम चालू करण्याची मुभा देण्यात यावी, असे मनसेचे सचिन चिखले म्हणाले.

अनेक महिने या व्यावसायिकांनी संयमाने सरकारी नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य केले आहे. पण, अनलॉक प्रक्रिया चालू होऊन देखील त्यांची निराशा झाली आहे. विरोधाभास म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी व्यायाम तितकाच गरजेचा आहे. यासाठी जिम चालू असणे अत्यावश्यक आहे. याउलट रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते असा जिम व्यवसाय बंद आहे. ही मोठी शोकांतिका आहे. यावरून सरकार जिमबाबत किती गंभीर आहे याची कल्पना येते. सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगाने मनसेच्या निवेदनाची तत्काळ दखल घेण्यात यावी व जिम चालू करण्यास सशर्त परवानगी देण्यात यावी अन्यथा मनसेकडून सर्व जिम चालकांसमवेत तिव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा मनसे ने दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.