ETV Bharat / state

Online Marriage Fraud : विवाहनोंदणी द्वारे ओळख झालेल्या पुरुषाकडून अत्याचार; आरोपीला अटक - ऑनलाईन विवाहनोंदणी महिला अत्याचार आरोपी अटक

विवाहनोंदणी द्वारे ओळख झालेल्या पुरुषाकडून अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने एका महिलेला फसवल्यावर लगेचच दुसऱ्या महिलेला फसवणूक करण्याचे ठरवले होते. त्याला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.

physical abused on woman by man pune
विवाहनोंदणी द्वारे ओळख झालेल्या पुरुषाकडून अत्याचार
author img

By

Published : Nov 29, 2021, 5:53 PM IST

Updated : Nov 29, 2021, 7:34 PM IST

पुणे - एका महिलेने विवाहासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर विवाहासाठी नोंदणी केली होती. या माध्यमातून तिची एका तरुणांशी ओळख झाली. या तरुणाने आपण जवान असल्याचे सांगत भावनिकरित्या ब्लॉकमेल करून तरुणीवर बलात्कार केला. पोलिसांनी याबाबत त्वरित कारवाई करत तरुणास पकडले. तो तरुण लष्करातून पळून आल्यानंतर तो सेवेत परत गेला नसल्याचे समोर आले आहे. ( Physical Abused on Woman by Army Man ) त्याला वेळीच पकडल्याने लातूरमधील एका महिलेची फसवणूक टळली आहे. प्रशांत भाऊराव पाटील (वय ३१, रा. कुंपटगिरी ता. खानापुर जि. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत २९ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली असून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात संबंधित जवानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Sinhgad Road Police Station )

पोलीस अधिकारी याबाबत माहिती देताना

यापुर्वीही गुन्हे दाखल -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा घटस्फोट झाला आहे. त्यांनी विवाह नोंदणी केली आहे. प्रशांतने या संकेतस्थळावरून त्यांना संपर्क केला. तसेच, त्यांना लष्करात जवान असल्याचे सांगत लष्कराच्या ड्रेसवरील फोटो पाठविले. दरम्यान, प्रशांत लष्करामध्ये जवान होता. मात्र, २०१८मध्ये तो पळून आला आहे. त्यानंतर तो परत गेलेला नाही. त्याने फसवणूक करण्याचे उद्योग सुरू केले. त्याच्यावर यापुर्वीदेखील गुन्हे दाखल झाला आहेत. लातूर, पुणे, अहमदनगर या शहरांत त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा - Shashi Tharoor With Women MPs : शशी थरुर यांनी मागितली माफी, संसदेला म्हणाले होते "आकर्षक ठिकाण"

काय आहे प्रकार -

ऑनलाइन साईटच्या माध्यमातून तक्रारदार महिलेशी ओळख झाल्यानंतर आरोपीने त्यांना दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात भेटण्यास बोलावले. भेट घेतल्यानंतर त्यांना प्रशांतने नव्या आयुष्याची सुरूवात येथे दर्शन करू, असे सांगत त्यांना गाडीत बसविले. त्यांना नर्हे येथील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी त्यांच्यावर बलात्कार केला. तसेच, त्यांना शनिवार वाडा येथे सोडून, अर्जंट ड्युटीला जायचे असल्याचे सांगत पळ काढला. त्यानंतर त्यांना ब्लॉककरून त्यांच्याशी संपर्क टाळला. त्यानंतर तक्रारदारांनी सिंहगड रोड पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे यांनी या घटनेची गांर्भियाने दखल घेत तपासाच्या सूचना केल्या.

आरोपी हा लष्कराचे नाव व गणवेश परिधान करत असल्याने पोलिसांनी पकडण्यासाठी कंबर कसली व तपासाला सुरूवात केली. उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ व त्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी तो अहमदनगरमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने त्यांना पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. विशेष म्हणजे, तो लातूरमधील एका महिलेला भेटण्यास निघाला होता. पोलिसांनी वेळीच पकडल्याने एका महिलेची फसवणूक टळली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, शंकर कुंभार, अमेय रसाळ यांच्या पथकाने केली.

Last Updated : Nov 29, 2021, 7:34 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.